मोदी सरकारकडून खुशखबर! वाहनांच्या किंमती ३० टक्क्यांनी उतरणार

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आर्थिक वर्ष २०२१ – २२ साठी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहे. सर्व सामान्यांचे लक्ष सध्या या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी त्यांनी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली.

अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी व्हॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली आहे. व्हॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे बंद पडत चाललेल्या वाहन क्षेत्राला चालना मिळणार आहे. खाजगी वाहने २० वर्षांनी तर व्यावसायिक वाहने १५ वर्षांनी भंगारात जाणार आहेत.

वाहने स्क्रॅप केल्याने प्रदुषण कमी होणार आहे आणि वाहनांच्या किंमतीही ३० टक्क्यापर्यंत कमी होण्यास मदत होईल. या नव्या पॉलिसीमुळे भंगार खरेदी विक्री व्यवसाय वाढण्याबरोबरच बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील.

एप्रिल २०२२ पासून या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकांनी प्रदूषण करणारी वाहने खरेदी करण्यापेक्षा इलेक्ट्रिक, सीएनजी वाहने खरेदी करावीत. जुन्या वाहनांना रस्त्यावरून हटवणे हा या निर्णयाचा उद्देश असल्याचं निर्मला सितारमण यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
“अर्थसंकल्पाचा सरळ आणि सोपा अर्थ देश विकायला काढला आहे”
महिलावर्गासाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय
अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी केली जोरदार टीका, ‘देशाची संपत्ती गरिबांच्या हातात नसून…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.