Homeइतरखुशखबर! इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी ठाकरे सरकार देतय अडीच लाख अनुदान; ‘असा’ घ्या...

खुशखबर! इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी ठाकरे सरकार देतय अडीच लाख अनुदान; ‘असा’ घ्या लाभ

जर तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण असाल आणि लवकरच इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर महाराष्ट्र सरकारने अशी ऑफर आणली आहे, जी ऐकल्यानंतर तुम्ही देखील इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार कराल. वास्तविक अर्ली बर्ड बेनिफिट स्कीम अंतर्गत महाराष्ट्रात निवडक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर २.५ लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

महाराष्ट्र सरकारने सादर केलेली ही अर्ली बर्ड बेनिफिट्स ऑफ बर्‍याच लोकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सरकारची ही योजना आधी केवळ ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत होती. पण, आता त्यात वाढ झाली असून ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्र सरकारची योजना सध्या फक्त दोन मॉडेल्ससाठी लागू आहे. ज्यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही Tata Nexon EV आणि टाटा टिगोर ईव्ही Tata Tigor EV इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे.

ज्यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही Tata Nexon EV आणि टाटा टिगोर ईव्ही Tata Tigor EV इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. अर्ली बर्ड बेनिफिट स्कीम अंतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंत १ लाख रुपयांची सूट दिली जात आहे. त्यानुसार, तुम्ही महाराष्ट्रात एकूण २.५ लाख रुपयांच्या सवलतीत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू शकता.त्यामुळे आता कार खरेदी करणे सोयीचे होणार आहे.

Tata Tigor EV ची भारतातील एक्स-शोरूम किंमत ११. ९९ लाख रुपयांपासून सुरू होते, जी बेस XE ट्रिमची किंमत आहे. XM ट्रिमची किंमत १२. ४९लाख रुपये तर XZ+ ट्रिमची किंमत १२.९९लाख रुपये एक्स-शोरूम आहे. जे ग्राहक ड्युअल-टोन कलर ऑप्सन्समध्ये कार खरेदी करण्यास इच्छुक आहेत, ते XZ+ ड्युअल टोन व्हेरियंट १३.१४ एक्स-शोरूम किंमतीला खरेदी करु शकतात.

टाटा मोटर्सने Ziptron तंत्रज्ञानासह नवीन Tigor EV लाँच केले. या तंत्रज्ञानासह टाटा ने सर्वप्रथम Tata Nexon EV भारतात लॉन्च केली. नेक्‍सॉन EV ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी EV आहे.टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक भारतीय बाजारात पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. Tigor EV चे पीक पॉवर आउटपुट ५५ kW आहे आणि पीक टॉर्क १७० Nm आहे. टाटाची ही कार ० ते ६० किमी प्रतितासचा वेग केवळ ५.७ सेकंदात मिळवते.

टाटाच्या या कारमध्ये २६ kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. ही टाटा कार ARAI प्रमाणित आहे जी एका चार्जमध्ये ३०६ किमीची रेंज देते. दुसरीकडे, Tata Nexon EV, ३०.२ kWh बॅटरी पॅक करते जी ३१२ किमीची रेंज ऑफर करण्याचा दावा केला जातो. Hyundai Kona Electric आणि MG ZS EV या अर्ली बर्ड बेनिफिट्स ऑफरमधून बाहेर ठेवण्यात आल्या आहेत कारण त्या गाड्या केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत येत नाहीत.

महत्वाच्या बातम्या

धक्कादायक! पद्म पुरस्कार विजेत्याचा दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल
हेलिकॉप्टर उडवायला गेला येडा तालिबानी, अवघ्या ४० सेकंदातच कोसळले जमिनीवर; पहा व्हिडीओ
..तर लाॅकडाऊन लावण्याचा विचार करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले लाॅकडाऊनचे संकेत

ताज्या बातम्या