आनंदाची बातमी; खाद्यतेलांच्या दरात तुफान घसरन; जाणून घ्या आजचा भाव

जेव्हा खाद्यतेल महाग होऊ लागले, तेव्हा त्याच्याशी संबंधित सर्व कारणे एकाच वेळी समोर येऊ लागली. परंतु कदाचित आता खाद्यतेलांना चांगले दिवस आले आहेत. यामागील प्रमुख कारण म्हणजे पुन्हा एकदा तेल स्वस्त होऊ लागले आहेत. हेच कारण आहे की, गेल्या चार दिवसांत खाद्य तेलांमध्ये 15 टक्के घट झाली आहे.

यापैकी एक सर्वात मोठे कारण मंगळवारी अमेरिकेत ठरविले गेले. यानंतर खाद्यतेल 40 ते 50 रुपये प्रति लीटर स्वस्त होणार असल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. किंमती खाली आणण्यासाठी खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.

आयात शुल्कात कपात केल्याने देशांतर्गत बाजारात खाद्य तेलाचे दर खाली येतील. परंतु तज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे फारसा फरक पडणार नाही. खरे तर खाद्य तेलांच्या किंमती वाढण्यामागील खरे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलबिया पिकांच्या उत्पादनातील संकट. तसेच मागणी आणि पुरवठा यातील अंतर खूप मोठे आहे.

खाद्यतेलांचे दर यापुढील काळात टिकून राहतील, असे पुणे मार्केट यार्डातील खाद्यतेलांचे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले. किरकोळ तसेच घाऊक बाजारात खाद्यतेलांना मागणी चांगली आहे. शेंगदाणा तेलाचे दर गेल्या काही दिवसांपासून टिकून आहेत. शेंगदाणा तेलाचे उत्पादन राज्यात मोठय़ा प्रमाणावर होते.

सूर्यफूल, पाम तेलाचे उत्पादन राज्यात केले जाते, असेही त्यांनी नमूद केले आहे. किरकोळ बाजारात एक किलो तेल पिशवीच्या दरात १० ते १५ रुपयांनी घट झाली आहे. घाऊक बाजारात १५ किलो तेलडब्याच्या दरात २०० ते २५० रुपयांची घट झाल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात शेंगदाणा तेलाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर केले जाते. इंडोनेशिया, मलेशिया, रशिया, स्वित्र्झलंड या देशांतून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आयात होते. करोनामुळे परदेशातून होणारी तेलांची आवक थांबली होती. त्यामुळे दरवाढ झाली होती. देशाची खाद्यतेलांची गरज वाढती आहे. त्यामुळे परदेशातील आयातीवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.