गुड न्युज! भारतात कोरोनाची दुसरी लसही तयार; ड्रग कंट्रोलरची परवानगी

 

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वीच देशात कोरोनाची पहिली लस तयार करण्यात आली. आता कोरोनाची दुसरी लसही तयार झाली असून त्याला मानवी चाचणीसाठी परवानगीही देण्यात आली आहे.

कोरोनाची ही दुसरी लस अहमदाबादच्या झायडस कॅडीला हेल्थकेअर लिमिटेडने तयार केली आहे. या लसीच्या फेज १ आणि फेज २ च्या मानवी चाचणीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यताही दिली आहे.

या चाचण्या पूर्ण होण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो असे म्हटले जात आहे. या लसीची प्राण्यांवर घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे.

प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचणीत यश मिळाल्याच्या आधारावर त्यांना पुढील फेज साठी परवानगी देण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.