खुशखबर! रेल्वेत पाच हजार जागांसाठी भरती, परीक्षा न घेताच होणार सिलेक्शन; ‘असा’ करा अर्ज

 

मुंबई | कोरोनाच्या संकटात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच यात अनेक कंपन्या बंद झाल्याने लोकांना नोकरी मिळणेही कठीण झाले आहे. अशा लोकांसाठी आता सुवर्ण संधी चालून आली आहे.

आता रेल्वे भरती होणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परिक्षेविना ही रेल्वे भरती होणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने ४ हजार ४९९ पदांवर भरती काढली होती.

आता रेल्वेने या भरतीच्या संख्येतही वाढ केली आहे. या रेल्वेने आणखी ४३२ जागा वाढवल्या आहे. आता सर्व मिळून ४ हजार ९३१ जागा झाल्या आहेत.

स्टोनोग्राफर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल, आरएसी मेकॅनिकल, वेल्डर, प्लंबर, प्रिंटर, कारपेंटर, टर्नर अशा ट्रेडसाठी ही भरती असणार आहे, विशेष म्हणजे परिक्षेविना ही भरती होणार आहे.

दरम्यान, यासाठी १६ ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्टपर्यंत आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

तसेच हा अर्ज १० वी पास ते आयटीआय उमेदवार भरू शकतात. उमेदवाराची निवड १० वी पासच्या गुणांवर करण्यात येणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.