गुड न्युज : मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार वाचून तुम्हीही व्हाल थक्क

 

मुंबई। मुंबई मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (MMRDA) ने मुंबई मेट्रोच्या वेगवेगळ्या पदांवर भरती आयोजित केली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in वर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

√ भरतीसाठीच्या रिक्त जागा…

• टेक्नीशियन १ – ५३ जागा
• टेक्नीशियन (सिव्हिल) १ – ८ जागा
• टेक्नीशियन (सिव्हिल) २ – २ जागा
• टेक्नीशियन (एसअँडटी) १ – ३९ जागा
• टेक्नीशियन (एसअँडटी) २ – २ जागा
• टेक्नीशियन (ईअँडएम) १ – १ जागा
• टेक्नीशियन (एसअँडटी) २ – १ जागा
• ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) – १ जागा
• जूनियर इंजीनियर (स्टोअर) – १ जागा
• ट्रॅफिक कंट्रोलर – १ जागा
• हेल्पर – १ जागा
• एकूण जागा – ११०

√ या पदांनुसार वेतन (पे स्केल)

• टेक्नीशियन १ – २५,५०० ते ८२,१०० रुपये प्रति महिना
• टेक्नीशियन (सिव्हिल) १ – १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रति महिना
• टेक्नीशियन (सिव्हिल) २ – २५,५०० ते ८१,१०० रुपये प्रति महिना
• टेक्नीशियन (एसअँडटी) १ – १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रति महिना
• टेक्नीशियन (एसअँडटी) २ – २५,५०० ते ८१,१०० रुपये प्रति महिना
• टेक्नीशियन (ईअँडएम) १ – १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रति महिना
• टेक्नीशियन (ईअँडएम) २ – १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रति महिना
• ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) – ३८,६०० ते १,२२,८०० रुपये प्रति महिना
• जूनियर इंजीनियर (स्टोअर) – ३८,६०० ते १,२२,८०० रुपये प्रति महिना
• ट्रॅफिक कंट्रोलर – ३८,६०० ते १,२२,८०० रुपये प्रति महिना
• हेल्पर – १५००० ते ४७,६०० रुपये प्रति महिना

√ यासाठी असा करा अर्ज..

मुंबई मेट्रोतील या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अर्जांची सुरुवात २७ जूनपासूनच केली गेली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै आहे. खुल्या गटासाठी ३०० रुपये तर आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना १५० रुपये फी भरावी लागणार आहे. ही फी देखील ऑनलाईन माध्यमातून भरायची आहे.

√ यासाठीच्या अटी

वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. याशिवाय वयाची अटही वेगवेगळी आहे. याच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.
Mumbai Metro vacancy notification 2020

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.