पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; शिमला, कुलू, मनाली पुन्हा पर्यटनासाठी खुले

 

शिमला | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या काळात पर्यटन स्थळेही बंद ठेवण्यात आली होती. यामुळे पर्यटकांना आपल्या भटकंतीच्या हौसेला आराम द्यावा लागला होता.

आता मात्र हिमाचल प्रदेशने पर्यटकांसाठी आपली दारे पुन्हा उघडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शिमला, मनाली, डलहौसी, चंबा, कुलू आणि कसौली ही लोकप्रिय ठिकाणे पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली आहे.

राज्यातील पर्यटन आठवड्याभरात सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील पर्यटन स्थळे जरी खुली करण्यात येणार असली तरी कोरोनाचा प्रसार वाढणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे.

दरम्यान, राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे असणार आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.