टूरिस्ट वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला मोठा फायद्याचा निर्णय

दिल्ली | राज्य सरकारने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. सरकारने ६ निर्णय घेतले आहेत. या ६ निर्णयांमुळे सहा प्रकारच्या वाहनांना फायदा होणार आहे.

मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, पर्यटक वाहने, खनिज वाहतूक, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक कँपर्स वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा यामध्ये समावेश आहे. मार्चपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा विचार करून शासनाने निर्णय घेतला आहे की, राज्यातील प्रवासी वाहनांना वार्षिक वाहन करात ५० टक्के सवलत मिळणार आहे.

ज्यांनी ३१ मार्च २०२० ला मागील आर्थिक वर्षाचा पूर्ण वाहन कर जमा केला असेल त्यांना एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षासाठी ही सवलत मिळणार आहे. वाहन कर भरण्यासाठी किमान ६ महिन्यांची सवलत मिळावी अशी व्यवसाय क्षेत्राची मागणी होती.

उत्पन्न कमी असल्याने वाहन कर भरणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सरकारने त्याची दखल घेत सहा महिन्यांचा कर माफ केला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे.

आता ज्या वाहन मालकांनी त्यांचा एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या आर्थिक वर्षाचा संपुर्ण वाहन कर ३१ मार्च २०२० पर्यंत किंवा त्यापुर्वी सरकारजमा केलेला असला तरच त्यांना पुढील आर्थिक वर्षासाठी ही सवलत मिळणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.