खुशखबर! १३ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकारने दिले मोठे गिफ्ट; सुरू केली खास सुविधा

भारतीय रेल्वेने आपल्या विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी गुरुवारी ऑनलाइन एचआर मॅनेजमेंट सिस्टम (एचआरएमएस) सुरू केली आहे. ज्याचा मोठा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. फक्त विशेष कर्मचाऱ्यांनाच नाही तर भारतीय रेल्वेने आपल्या १३ लाख कर्मचार्‍यांना मोठे गिफ्ट दिले आहे.

रेल्वेने कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी आता डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) सुरू केली आहे. या सुविधेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अ‍ॅडव्हान्स मॉड्यूलद्वारे त्यांचे पीएफ बॅलेन्स चेक करता येणार आहे. याशिवाय त्यांना अ‍ॅडव्हान्स पीएफसाठी ऑनलाईन अर्जही करता येणार आहे.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या खास सुविधेबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त एचआरएमएस (HRMS) आणि यूझर डेपोची मॉड्यूल्स बाजारात आणण्यात आली आहेत. ज्यामध्ये कर्मचारी सेल्फ सर्व्हिस (ESS) चा लाभ घेऊ शकतात.

यात कर्मचार्‍यांना त्यांचा पीएफ अर्जाची तारीखही ऑनलाइन पाहता येईल. इतकंच नाही तर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सेटलमेंट मॉड्यूलसुद्धा सुरू करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या संपूर्ण सेटलमेंट प्रक्रियेचं डिजिटायझेशन करण्यात येईल.

रेल्वे बोर्डाने आज एचआरएमएसचे तीन नवीन मॉड्यूल लॉन्च केले आहेत, ज्यात कर्मचारी सेल्फ सर्व्हिस, प्रॉव्हिडंट फंड अ‍ॅडव्हान्स, सेटलमेंट आणि यूजर डेपो मॉड्यूल. याबाबत रेल्वेकडून ट्विट करण्यात आले आहे.

कोरोनावरील लस घेतली तरी सुटका नाहीच, ‘हे’ साईड इफेक्ट्स दिसणार; संशोधनातून सिद्ध

हायकोर्टाचा शिवसेनेला दणका; कंगणाच्या ऑफीसवरची कारवाई अवैध, भरपाई द्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.