गोमूत्र पिल्यामुळे मला कोरोना झाला नाही; भाजप खासदाराचा दाव्याने उडाली खळबळ

गेले वर्षभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने पण हाहाकार माजला आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गोमूत्र पिल्यामुळे कोरोना होत नाही असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वेळ काळाचे भान न ठेवता भाजपचे काही नेते वक्तव्य करत असतात. त्यापैकीच एक प्रज्ञासिंह ठाकूर यांना ओळखले जाते. त्यांनी असे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

भोपाळ शहरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की गोमुत्राचा अर्क घेतल्याने फुफ्फुसातील संसर्ग दूर होतो. त्यांनी स्वतः गोमुत्राचा अर्क घेत असल्याचे म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे की, मी स्वतः गोमुत्राचा अर्क घेते. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचे औषध घ्यावे लागत नाही. मला आतापर्यंत कोरोना झाला नाही. त्यांनी यावेळी सर्वानी गोमूत्र प्यावे असा मोलाचा संदेश दिला आहे.

भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाला त्या संबोधित होत्या तेव्हा त्यांनी असे बेताल वक्तव्य केले आहे. साध्वी प्रज्ञासिंह त्यांच्या बेताल वक्तव्यासाठीच ओळखल्या जातात. त्यांनी केलेल्या विधानामुळे भाजपवर विविध माध्यमातून आरोप होत आहेत.

देशात कोरोनाची लाट एकीकडे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या लाटेमुळे सत्ताधारी पक्षांची जबाबदारी वाढली आहे. दिवसरात्र कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना भाजपच्या मंत्र्यांकडून तर्हेतर्हेचे आरोप केले जात आहेत.

ताज्या बातम्या
जुही चावला, माधूरी दिक्षितसोबत ‘या’ अभिनेत्री चित्रपटाच्या शुटींग वेळी होत्या गरोदर
खुपच रागीट होती तब्बूची बहीण फराह नाज, रागात चंकी पांडेला केली होती मारहाण; वाचा पुर्ण किस्सा

अरे बापरे! ‘हा’ कर्मचारी आईसक्रिम टेस्ट करण्यासाठी घेतो करोडो रुपये; वाचा त्याच्याबद्दल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.