राजधानी किल्ले रायगडावर सापडली शिवकाळातील ३५० वर्षांपूर्वीची सोन्याची बांगडी

 

 

किल्ले रायगडाच्या विकासासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी रायगड प्राधिकरण समितीमार्फत किल्ल्यावरील साडे तीनशे ठिकाणांचे उत्खनन करण्यात येणार आहे, असे असताना या उत्खननात गेल्या काही वर्षात काही अत्यंत दुर्मिळ अशा पुरातनकालीन वस्तू सापडत आहे.

अशात आता शुक्रवारी सुरू असलेल्या उत्खननामध्ये एक अनमोल साठा सापडला आहे. या उत्खनन कामात सुमारे ३५० वर्षांपूर्वीची अडीच तोळ्याची सोन्याची बांगडी सापडली आहे. तसेच छोटी निरांजने पण सापडली आहे

रायगड इथल्या जगदीश्वर मंदिराशेजारी असलेल्या एका वाड्याच्या उत्खननामध्ये ही नक्षीदार सोन्याची बांगडी संपली आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्त्रियांचा अलंकार सापडला आहे.

किल्ल्यावर सापडलेल्या हा अलंकार सुमारे ३५० वर्षांपूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहासाची साक्ष देणारा आहे. गेल्या दोन महिन्यात या उत्खननात वेगवेगळ्या गोष्टी सापडत असून कानातल्या रिंगा पण सापडल्या होत्या.

ज्या वाड्यात ही नक्षीदार बांगडी सापडून आली आहे, तिथे एक मोठा सरदार राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देत, छत्रपती घराण्याचा एक वंशज म्हणून किल्ल्यावर सापडलेली बांगडी ही फार मोठा शोध असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.