Share

Driving job: ड्रायव्हरसाठी सुवर्णसंधी! जर तुम्हाला ड्रायव्हींग येत असेल तर मिळेल ६३ हजार पगार; ‘असा’ करा अर्ज

Driving - job

ड्रायव्हींग जॉब (Driving job): प्रत्येकालाच आपले करिअर बनवायचे आहे. संधीसुद्धा प्रत्येकाला उपलब्ध होते. जशी आता ड्रायव्हिंगची आवड व अनुभव असणाऱ्यांसाठी झाली आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर इथे लवकरच चालक या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची सूचना जारी करण्यात आली आहे.

पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याकरिता ड्रायव्हिंगचा अनुभव असणे महत्वाचे आहे.

चालक या पदासाठी भरती असून एकूण २१ जागा आहेत. या पदांसाठी अटी व शर्ती आहेत त्या पूढीलप्रमाणे,
१. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
३. उमेदवारांना ड्रायव्हिंग येणं आवश्यक आहे.
४. उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.
५. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेकडून ट्रक, ट्रॅक्टर, जीप 3 वर्षांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
६. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
७. उमेदवाराचे वयाचे २५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

 

चालक या पदासाठी 19,900/- ते 63,200/- रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे. अर्ज करण्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे,
१. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
२. Resume (बायोडेटा) स्वतःची संपूर्ण माहिती असलेला
३. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
४. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
५. शाळा सोडल्याचा दाखला
६. पासपोर्ट साईझ फोटो

ऑफलाईन अर्ज करण्यासाठीचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006 (महाराष्ट्र).

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2022 आहे. इच्छुकांनी व गरजू व्यक्तींनी लवकरात अर्ज करा. संधीचा लाभ घ्या. अधिक माहिती साठी https://www.gsi.gov.in/ ही अधिकृत वेबसाईड आहे.

महत्वाच्या बातम्या
दिघेसाहेब घात झालाय, छातीवर नाही पाठीवर वार झालाय, तुम्ही माफ केलं असतं का? राजन विचारेंचं भावनिक पत्र
Urfi Javed VIDEO: नुसती तार गुंडाळून उर्फी जावेदने केल्या सर्व मर्यादा पार, बोल्डनेस पाहून लोकांचाही सुटला संयम; असे झापले की…
‘सत्तार साहेब, तुम्ही मुख्यमंत्री शिंदेंकडून पैसे घेतले आणि लखपती झाले, मात्र…,’ रावसाहेब दानवेंनी केला गौप्यस्फोट

ताज्या बातम्या तुमची गोष्ट शिक्षण

Join WhatsApp

Join Now