नवरात्रौत्सवात सोने खरेदी करताय, त्याच्याआधी जाणून घ्या सोन्याचे नवे दर

 

नवी दिल्ली | दिवाळी दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक लोक सोने-चांदी घेण्याच्या विचारात आहे. कोरोनाच्या संकटात सोन्या-चांदीच्या भावामध्ये चांगलाच चढ-उतार दिसून आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमती उतरत असताना, शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ पहायला मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतींमुळे देशातील अंतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतींना भाव वाढला आहे. तसेच कोरोना संकटामुळे अनेक देशांनी आपल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे, परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारपेठतील भाव वाढले आहे.

गेले तीन दिवस उतरत असणाऱ्या सोन्याचे भाव शुक्रवारी ३२४ रुपयांनी दिल्लीतील सराफ बाजारात वाढले आहे. त्यामुळे सोन्याचे दर हे आता ५१,७०४ रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. तर सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १,९१० डॉलर प्रति औंस एवढी आहे.

सोन्या पाठोपाठ चांदीचे भावही शुक्रवारी वाढताना दिसून आले. शुक्रवारी चांदीच्या भावात १५९५ रुपयांची वाढ दिसून आली. आता चांदी ६२,९७२ रुपये प्रति किलो एवढी झाली आहे.

दरम्यान, अमेरिकेतील निवडणुकांमुळे सोन्यामधील सुरक्षित गुंतवणूक वाढू शकते. त्यामुळे डॉलरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंगनाला न्यायालयाचा दणका; धार्मिक तेढ पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

तुमचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! भाजपच्या शेलारांनी केले चक्क ठाकरेंचे कौतूक

डोक दुखत असेल तर हे भन्नाट घरगुती उपाय करा; डोकेदुखी कुठल्या कुठे पळून जाईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.