सोन्या चांदीच्या दरात हजारोंची घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

मुंबई | कोरोनाच्या संकटात सोने-चांदी यांच्या दरात चांगलाच चढ उतार दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच घसरण होताना दिसत आहे.

सोमवारी सोन्याचे भाव वाढत असताना सोन्याचे दर आता अचानक घसरले आहे. सोमवारी सोने ५०, ६८७ रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत स्वस्त झाले असताना आज पुन्हा सोने ८७ रुपयांनी स्वस्त झाले असून बाजारभावाच्या सुरुवातीला सोन्याची किंमत ५०, ६८७ रुपये प्रति १० ग्रॅम झाली होती.

आता सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण झाली असून सोने ५०, ५२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

चांदीचे दर ८०,००० रुपये प्रति किलोग्रॅम होती. मात्र बाजार उघडताच चांदीची किंमत ६१,२५० रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. चांदीच्या किंमतीत १८,११८ रुपये प्रति किलोग्रॅम पर्यंत घसरण झाली आहे.

दरम्यान, अमेरिकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकांमुळे अनुदानपर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

५ रूपयांचे एक नाणं बनवेल तुम्हाला लखपती; कसं ते वाचा…

अखेर कपिलने मुकेश खन्ना यांना दिले प्रत्युत्तर; म्हणाला मी आणि माझी टीम…

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चंद्रकांत पाटील, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.