Gold Silver Rate : भारतीय सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या भावात ठळक वाढ नोंदवली गेली. विशेषतः चांदीच्या दरात तब्बल 4034 रुपयांची उसळी पाहायला मिळाली आहे. जीएसटीशिवाय चांदीचा भाव 178684 रुपये प्रतिकिलो झाला असून जीएसटीसह हे दर 184044 रुपये झाले आहेत. याचबरोबर सोन्याच्या दरातही वाढ होत असून त्याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांवर जाणवत आहे.
काल 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 127593 रुपये होता. आज त्यात वाढ नोंदवली गेली असून बाजारात सोन्याचं मूल्य आणखी वर चढलं आहे. 22 कॅरेट, 23 कॅरेट आणि 18 कॅरेटचे दरही वाढीच्या मार्गावर आहेत.
24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ
आज 24 कॅरेट सोन्याच्या भावात 957 रुपयांची वाढ नोंद झाली असून हा दर वाढून 128550 रुपये झाला आहे. जीएसटीसह हा भाव 132406 रुपये इतका झाला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या किमतीतही वाढ झाली असून जीएसटीसह त्याचा दर 121284 रुपये आहे. 17 ऑक्टोबर रोजी सोन्यानं एक उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा दर 130874 रुपये होता. सध्या त्यापेक्षा सोनं 2324 रुपये स्वस्त उपलब्ध आहे.
23 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचे ताजे भाव
23 कॅरेट सोन्यात 953 रुपयांची वाढ होऊन ते 128035 रुपये प्रति तोळा झाले आहे. जीएसटीसह हा भाव 131876 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्यात 877 रुपयांची वाढ होऊन त्याचा जीएसटीशिवाय दर 117752 रुपये झाला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 718 रुपयांची वाढ झाल्याने ते आता 96413 रुपये झाले आहे. 14 कॅरेट सोनं 560 रुपयांनी वाढून 77458 रुपये वर पोहोचलं आहे.
2025 मध्ये प्रचंड उसळी
गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल 52810 रुपयांची वाढ झाली आहे. चांदी तर आणखी आक्रमक वाढ दर्शवत असून तिचा दर 92667 रुपये ने वाढलेला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन दररोज दोन वेळा सोन्याचे दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरा अपडेट सायंकाळी ५ वाजता. त्यामुळे सोन्याचे दर सतत बदलत राहतात.
गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
2025 हे वर्ष सोने व चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरलं आहे. जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतली आहे. औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीच्या किमतींनीही झेप घेतली. 2024 च्या शेवटी 24 कॅरेट सोनं 75 हजार रुपये प्रतितोळा होतं, तर चांदी 86000 रुपये प्रतिकिलो होती. आजच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे.





