Share

Gold Rate : सोने चांदीच्या दरात जोरदार उसळी, ट्रम्प टॅरिफनंतर सोन्याचा दर पातळीवर, जाणून घ्या आजचा भाव

Gold Rate : सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा मोठी उडी पाहायला मिळतेय. देशांतर्गत सराफ बाजारात सोन्याचे दर इतिहासात प्रथमच विक्रमी पातळीवर पोहोचले असून चांदीचाही भाव झपाट्यानं वाढलाय. यामागे आंतरराष्ट्रीय घडामोडी, विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नव्या टॅरिफ धोरणाचा मोठा परिणाम असल्याचं स्पष्ट झालंय.

२४ कॅरेट सोन्याचा दर १ लाखाच्या वर

२४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर तब्बल ५९६ रुपयांनी वाढून १००६७२ रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह या सोन्याचा दर १,०३,६९२ रुपये प्रति तोळा झाला आहे. हे दर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) च्या दुपारी १२.३७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार निश्चित करण्यात आले. त्या वेळेस सोन्याचा दर १,०१,०८९ रुपये होता, तर चांदीचा दर १,१३,४४५ रुपये प्रति किलो होता.

चांदीच्या दरातही मोठी उसळी

चांदीही मागे नाही. तिचा दर ११५४ रुपयांनी वाढून १,१३,५७६ रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर आता १,१६,९८३ रुपये प्रति किलो झाला आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी चांदीचा दर ८६,०१७ रुपये होता, म्हणजेच आता चांदीचा दर जवळपास २७,५५९ रुपयांनी वाढलाय.

विविध कॅरेट्सचे आजचे दर:

  • २३ कॅरेट: ५९२ रुपयांनी वाढ, नवा दर – १,००,२६९ रुपये

  • २२ कॅरेट: ५९४ रुपयांनी वाढ, नवा दर – ९२,२१६ रुपये, जीएसटीसह – ९४,९८२ रुपये

  • १८ कॅरेट: ४८३ रुपयांनी वाढ, नवा दर – ७५,५४० रुपये, जीएसटीसह – ७७,८०६ रुपये

  • १४ कॅरेट: दर – ६०,६५९ रुपये प्रति तोळा

दरवाढीची कारणं काय?

बाजारात मागणी वाढली असून ठोक व्यापारी आणि स्टॉकिस्ट मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. यामुळे सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदार सोनं हा सुरक्षित पर्याय म्हणून निवडत आहेत.

याशिवाय, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादलं आहे, ज्यामुळं जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे. औषधं, चिप्स यांसारख्या गोष्टींवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे.

भारतातील दर कसे ठरतात?

भारतामध्ये इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion and Jewellers Association) दररोज दोन वेळा सोने आणि चांदीचे दर जारी करते. हे दर विविध कर रचनेनुसार शहरागणिक थोडेफार बदलू शकतात. आयात शुल्क, डॉलर-रुपया विनिमय दर, मागणी आणि पुरवठा यावर हे दर ठरतात.

भारतामध्ये सोनं ही केवळ गुंतवणूक म्हणून न पाहता, ती लग्नसराई, सणवार आणि सांस्कृतिक परंपरांचा भाग असल्यामुळे दरवाढीचा थेट परिणाम सामान्य खरेदीदारांवर होतो.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now