Gold Rate Today : गणेशोत्सवाच्या काळात सतत वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच ताण बसला होता. मात्र सणासुदीचा काळ संपताच सोन्याच्या दरात मोठा उलटफेर दिसून आला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव खाली आल्याने दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
सोन्याचा दर लाखाच्या घरात कायम
आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या ऑक्टोबर वायद्याची किंमत तब्बल 607 रुपयांनी घसरली असून ती 1,07,162 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी झाली आहे. म्हणजेच भाव घटला असला तरी तो लाखाच्या वरच टिकून आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर आज 99,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोनं 1,08,380 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.
चांदीच्या किमतीतही घट
सोन्यासोबतच चांदीच्या भावातही लक्षणीय घट दिसून आली आहे. एका किलो चांदीची किंमत 1,27,000 रुपये नोंदवली गेली आहे. यामुळे दागिन्यांच्या बाजारात आता किंमतीत घसरण दिसून आली आहे.
मोठ्या शहरांतील दरात फरक नाही
मुंबई (Mumbai city), पुणे (Pune city), नागपूर (Nagpur city), कोल्हापूर (Kolhapur city), जळगाव (Jalgaon city) आणि ठाणे (Thane city) या सर्व प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 99,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोनं 1,08,380 रुपये इतकंच विकलं जात आहे. कालच्या तुलनेत सर्वच शहरांमध्ये सुमारे 100 रुपयांची घट नोंदवली गेली आहे.
सणानंतर घसरलेला दर
मागील महिन्यातील आणि गणेशोत्सव काळातील वाढलेला दर लक्षात घेता सोन्याच्या खरेदीला जोर आला होता. मात्र आता सण संपताच किमतींमध्ये घट झाली आहे. पुढील काही दिवसांत मोठे सण-उत्सव नसल्याने सोन्याचा दर स्थिर किंवा घसरत राहण्याचीच शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.