Gold Rate : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा फरक दिसून आला आहे. सतत महाग होत असलेल्या सोन्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट बिघडले होते. मात्र आता सराफा बाजारात थोडासा यू-टर्न घेत भाव स्थिरावल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. आगामी नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या सणामुळे सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असली तरी सध्या मात्र ग्राहकांना खिशाला हलकं वाटतंय.
MCX वरील दर घटले
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या वायदा किमतीत घट नोंदवली गेली आहे. सध्या वायदा दर 1,09,281 रुपये असून, तो जवळपास 100 रुपयांनी कमी झाला आहे. यामुळे बाजारात थोडीशी घसरण झालेली दिसते.
२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे भाव
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,01,900 रुपये असून, २४ कॅरेट सोन्याचा दर 1,11,170 रुपये आहे. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नागपूर (Nagpur), कोल्हापूर (Kolhapur), जळगाव (Jalgaon) आणि ठाणे (Thane) या शहरांमध्ये दर एकसमान नोंदवले गेले आहेत.
चांदीचाही स्थिर भाव
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही स्थिरता दिसून येत आहे. एक किलो चांदीची किमत 1,33,000 रुपये एवढी कायम आहे.
सणासुदीला भाव वाढण्याची शक्यता
गणपतीत सोन्याने महागाईचा उच्चांक गाठला होता. त्यामुळे नवरात्र आणि दिवाळीत पुन्हा एकदा सोन्याला भाव येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्या भाव स्थिर असले तरी सणासुदीत वाढ होणं अपरिहार्य आहे.