Gold Rate : लग्नांचा हंगाम सुरू असताना सोने व चांदीच्या किमतींमध्ये सतत घट होत असल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळत आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या ताज्या दरांनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,149 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला आहे. मागील दिवशी हा दर 1,22,881 रुपये होता, म्हणजेच एका दिवसात सोनं 732 रुपयांनी स्वस्त झाले. चांदीचा भावही याच कालावधीत 4465 रुपयांनी कमी होऊन 1,55,840 रुपयांवरून खाली आला आहे.
23 कॅरेट सोन्याचा दर 1,21,660 रुपये असून 22 कॅरेटसाठी 1,11,888 रुपये प्रति तोळा इतकी किंमत नोंदवली आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 91,612 रुपये तर 14 कॅरेट सोन्याचा दर 71,457 रुपये प्रतितोळा एवढा आहे. आठवड्यात सोन्याचे दर जास्त होते. मागील शुक्रवारी 24 कॅरेट सोनं 1,25,428 रुपये प्रति तोळा नोंदवले गेले होते. त्यामानाने या आठवड्यात सोनं तब्बल 3009 रुपयांनी घसरले आहे. 23 कॅरेटचेही दर त्याच काळात मोठ्या प्रमाणात खाली आले.
चांदीही मागील आठवड्यात 1,59,367 रुपयांवर होती, मात्र आता ती 7992 रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ ठरत आहे. IBJA दररोज दुपारी 12 आणि सायंकाळी 5 वाजता अधिकृत दर जाहीर करते. शहरानुसार 1000 ते 2000 रुपयांचा फरक पडू शकतो. दागिने खरेदी करताना 3% जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वेगळे लागतात.
2025 मध्ये सोन्याने गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला. डिसेंबरमध्ये सोनं 75 हजार रुपयांवर होतं, तर आता ते 1 लाख 22 हजारांच्या वर पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय संघर्ष, आर्थिक अस्थिरता, डॉलरचे दुर्बल होणे आणि फेड रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या शक्यता या सर्वांचा सोन्याच्या मागणीवर थेट प्रभाव पडतो. जगभरातील अनेक केंद्रीय बँका डॉलरऐवजी सोने साठवणे पसंत करत असल्याने सोन्याच्या बाजाराला आणखी बळ मिळते.





