Gold Rate 28 July 2025 : श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं पुन्हा महाग झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चटका बसला आहे. 28 जुलै 2025 रोजी (28 July 2025) बाजारात सोन्याच्या किमतीत तब्बल 200 ते 250 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. मागील काही दिवसांत उतरती कळा अनुभवलेलं सोनं पुन्हा एकदा झळाळू लागलं आहे.
आज MCX मार्केट (MCX) वर सोन्याचा दर 98,019 रुपये प्रतितोळ्यापर्यंत पोहोचला आहे. त्याचवेळी, 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 91,600 रुपये इतका आहे, तर 24 कॅरेट सोनं 99,930 रुपये प्रतिदहा ग्रॅमवर स्थिर आहे.
मुंबईसह राज्यभरात भाव स्थिर
मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नागपूर (Nagpur), कोल्हापूर (Kolhapur), जळगाव (Jalgaon), ठाणे (Thane) या प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पुढीलप्रमाणे कायम आहेत:
22 कॅरेट सोन्याचे दर (10 ग्रॅम):
-
मुंबई (Mumbai): ₹91,600
-
पुणे (Pune): ₹91,600
-
नागपूर (Nagpur): ₹91,600
-
कोल्हापूर (Kolhapur): ₹91,600
-
जळगाव (Jalgaon): ₹91,600
-
ठाणे (Thane): ₹91,600
24 कॅरेट सोन्याचे दर (10 ग्रॅम):
-
मुंबई (Mumbai): ₹99,930
-
पुणे (Pune): ₹99,930
-
नागपूर (Nagpur): ₹99,930
-
कोल्हापूर (Kolhapur): ₹99,930
-
जळगाव (Jalgaon): ₹99,930
-
ठाणे (Thane): ₹99,930
महागाई मागचं कारण काय?
गेल्या काही आठवड्यांत अमेरिका (USA) व इतर आंतरराष्ट्रीय देशांतील व्यापार धोरणं, डॉलरमध्ये चढ-उतार, आणि गुंतवणूकदारांची अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दरात सतत चढ-उतार दिसत आहेत. अमेरिकेने (USA) काही नविन व्यापार करार स्वीकारले असून त्याचा परिणाम जागतिक सोन्याच्या बाजारावरही होतोय.
चांदी झाली स्वस्त
सोन्यासोबतच चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. आज 1 किलो चांदीचा दर 1,15,900 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी हाच दर होता, मात्र बाजारात सध्या स्थिरता जाणवत आहे.