मुंबई । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. सोन्याचे दर ५० हजारांच्या पार गेले होते. मात्र दिवाळीनंतर हे दर कमी झाले. यामध्ये ८००० हजारांनी हे दर कमी झाले आहेत.
लोकांनी आता सोन्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सोन्याची मागणी कमी झाली परिणामी किंमतही कमी झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे सोन्याचे भाव कमी झाले आहेत.
आता गुंतवणूकदारांसाठी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०२१ च्या सुरुवातीला सोने 42,000 प्रति ग्रॅम वर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढील दोन महिन्यांमध्ये सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये सोने ५६३७९ रुपयांवर गेले होते. तेव्हा ते आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रशियाची स्तुतनिक व्ही कोरोना लस येताच सोन्याचे भाव कमी झाले.
आता सोन्याचा भाव ४८१०६ प्रति १० ग्रॅमवर आला. कोरोना लसीसंबंधित चांगल्या बातमीनंतर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने घट झाली आहे. सोन्याच्या किंमती घसरण्याचा ट्रेंड अजून दिसू शकेल. नवीन वर्षानंतर ही लस बाजारात आणली गेली तर एमसीएक्सवरील सोन्याची किंमत ४५००० रुपयांवर येऊ शकते.