आठ महिन्यातील सगळ्यात स्वस्त दराने मिळतय सोने; आताच खरेदी करा, पुढे वाढणार भाव

मुंबई | गेल्या अनेक महिन्यापासून सोन्याच्या किमती वाढताना दिसून येत आहेत. परंतु पाठीमागच्या अवघ्या वीस दिवसांत सोने ३२९२ रुपयांनी घसरले आहे. तर यापुढे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या काही दिवसांत सोन्याच्या भावातही वाढ होण्याची चिन्हे आहेत.

भारतात सोन्याला जास्त मागणी आहे. तसेच यंदाची लग्नसराई आणखी बरीच शिल्लक आहे. एप्रिलपासून लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. यामुळे सोने-चांदीच्या दरावर लग्नकार्ये असणाऱ्या लोकांचे विशेष लक्ष आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये व त्यानंतर सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांनी सोन्यांच्या भावात नोंदवल्या जाणाऱ्या घसरणीचा फायदा घेण्याचा विचार करायला हवा.

दरम्यान, केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला बजेटदरम्यान सोने-चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली होती. याचे परिणाम सराफा बाजारात पाहायला मिळाला. बजेट भाषण संपताच १२०० रुपयांनी सोन्याचे भाव घसरले होते.

यानंतर सतत सोन्याचे दर कमी झाले आहेत. १२ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान सोन्याच्या भावात ११९६ रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. परंतु सोन्याचे भाव हे जागतिक परिस्थिवर अवलंबून असतात. कोरोना महामारीत गुंतवणूकदार स्टॉक मार्केटपेक्षा सोन्यांमध्ये जास्त गुंतवणूक करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर भविष्यात सोन्याचे दर अवलंबुन असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
बजेटच्या दिवशी स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, दहा ग्रॅमवर इतक्या रुपयांची सूट
नविन वर्षाच्या मुहूर्तावर मोदी सरकारने दिली स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी
आनंदाची बातमी! इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सरकारकडून मिळणार तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त अनुदान
…तर पुन्हा कडक लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.