Share

Gold Price Update 29 July 2025 : श्रावणात सोनं खातय भाव; ग्राहकांच्या चिंतेत भर, जाणुन घ्या आजचा दर

Gold Price Update 29 July 2025:  श्रावण महिन्याच्या प्रारंभापासून सोन्याच्या किमतीत घट होणं, ग्राहकांमध्ये चिंता निर्माण करणारे असं एक मोठं बदल समोर आलं आहे. सहसा श्रावण महिन्यात सोन्याच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा असते, कारण या महिन्यात लोक विशेषतः दागिने खरेदी करतात. पण यावर्षी, हे प्रत्यक्षात घडताना दिसत नाही. उलट, सोन्याच्या किमतीत 100 रुपयांनी कमी होण्याचा ट्रेंड दिसत आहे.

आज सकाळी MCX वर सोन्याच्या वायदा किमतीत 70 रुपये वाढ होताना दिसले, ज्यामुळे त्याची किमत 97,615 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 91,500 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 92,800 रुपये आहे. त्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 100 रुपयांची घट दिसत आहे.

सोन्याच्या किमती घसरण्याचे कारण

अलीकडील काळात सोन्याने लाखोंच्या रक्कमेपर्यंत पोहोचले होते, परंतु आता त्यामध्ये अचानक घट पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किमती घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेतील आणि युरोपियन युनियनमधील व्यापार करार. या करारांमध्ये अमेरिकन बाजारात युरोपियन वस्तूंवर 15% शुल्क लागू करण्याची शक्यता आहे, तसेच अमेरिकन उद्योगात युरोपियन युनियनकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे, जागतिक व्यापाराची स्थिती स्थिर होईल अशी आशा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये पैसा कमी केला आणि शेअर बाजारात गुंतवणूक वाढवली आहे.

सोन्याच्या किमतीत घट

आजच्या दरानुसार, विविध शहरांतील सोन्याच्या किमती खालीलप्रमाणे आहेत:

22 कॅरेट सोन्याचा दर:

शहर आजचा दर (प्रति १० ग्रॅम) कालचा दर (प्रति १० ग्रॅम)
मुंबई 91,500 रुपये 91,600 रुपये
पुणे 91,500 रुपये 91,600 रुपये
नागपूर 91,500 रुपये 91,600 रुपये
कोल्हापूर 91,500 रुपये 91,600 रुपये
जळगाव 91,500 रुपये 91,600 रुपये
ठाणे 91,500 रुपये 91,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर:

शहर आजचा दर (प्रति १० ग्रॅम) कालचा दर (प्रति १० ग्रॅम)
मुंबई 99,820 रुपये 99,930 रुपये
पुणे 99,820 रुपये 99,930 रुपये
नागपूर 99,820 रुपये 99,930 रुपये
कोल्हापूर 99,820 रुपये 99,930 रुपये
जळगाव 99,820 रुपये 99,930 रुपये
ठाणे 99,820 रुपये 99,930 रुपये
ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now