Share

Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या बाजारात भूकंप! सोने 24 लाख पार होणार, चांदी 3 लाखांच्या घरात? गोंधळ उडवणारी भविष्यवाणी, काहीतरी मोठं घडणार?

Gold Silver Price:  गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या भावात थोडी उसळी आलीय, पण प्रसिद्ध आर्थिक तज्ज्ञ आणि लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी केलेली नवी भविष्यवाणी ऐकून अनेक गुंतवणूकदारांचे डोळे विस्फारले आहेत. त्यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाउंटवर एक पोस्ट करत सांगितलंय की, येत्या काळात सोने आणि चांदी दोन्हींच्या दरात प्रचंड वाढ होणार असून, अर्थविश्वात मोठा भूचाल घडू शकतो.

सोन्याचा भाव 24 लाख पार जाणार?

कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता येत्या काळात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 100 ग्रॅम 24 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, COMEX (Commodity Exchange Market) वर सोन्याचा भाव थेट $27,000 पर्यंत झेप घेऊ शकतो. म्हणजे भारतीय बाजारात सोनं अक्षरशः ‘अग्निद्रव्य’ होणार आहे.

त्यांच्या अंदाजानुसार, जर हे भाकीत खरं ठरलं, तर सध्याच्या रुपयाच्या मूल्यांनुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 23,94,705 रुपये होईल. याचा अर्थ, सामान्य माणसासाठी लग्नसराई, सणासुदी किंवा साठवणुकीसाठी सोनं घेणं ही गोष्ट आता स्वप्नातली राहू शकते. मध्यमवर्गीय कुटुंबांना दागिन्यांसाठी कर्ज घ्यावं लागेल, तर गुंतवणूकदार वर्ग या परिस्थितीत करोडपती होऊ शकतो.

सोन्याबरोबरच चांदीबाबतही रॉबर्ट कियोसाकी यांनी जबरदस्त भाकीत केलं आहे. त्यांच्या मते, 2026 पर्यंत प्रति किलो चांदी $100 च्या घरात पोहोचू शकते. जर हे खरं ठरलं, तर भारतीय बाजारात चांदीचा दर प्रति किलो 3 लाखांपेक्षा जास्त झेप घेईल. म्हणजे, ज्यांच्याकडे आज थोडीशी चांदी साठवलेली आहे, तेच उद्या मनसबदार ठरणार!

कियोसाकी सोन्या-चांदीबरोबर बिटकॉइन (Bitcoin) आणि इथरियम (Ethereum) विषयीही प्रचंड उत्साही आहेत. त्यांनी सांगितलं की 2026 पर्यंत बिटकॉइनचा भाव $2,50,000 पर्यंत जाऊ शकतो, तर इथरियम $60,000 पार जाईल. म्हणजे डिजिटल चलन क्षेत्रातही मोठी क्रांती होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

अमेरिकेवर कियोसाकींचा आरोप

या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, यूएस फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) आणि ट्रेझरी (Treasury) सतत नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि कर्जफेडीसाठी बनावट नोटा छापत आहेत. त्यांच्या मते, अमेरिका ही जगातील सर्वात मोठी ‘कर्जदार राष्ट्र’ बनली आहे आणि ते टिकणं फार काळ शक्य नाही. त्यामुळेच ते सोनं आणि चांदी या ‘दुर्मिळ आणि सुरक्षित’ गुंतवणुकींना भविष्यातील सर्वात मोठा फायदा मिळेल असं सांगतात.

ताज्या बातम्या राजकारण व्यवसाय

Join WhatsApp

Join Now