महिन्याभरात सोने चार हजार रुपयांनी घसरले; अजून सोने किती रुपये घसरणार?

दिल्ली | कोरोना लसीचा परिणाम सोन्यावर होत आहे. भारतात तीन लसींवर काम सुरू आहे. तसेच पुढील महिन्यात अमेरिकेच्या दोन लसी पुढील महिन्यात बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनामुळे गुंतवणूकदारांनी त्यांचा पैसे शेअर मार्केटमधून काढून सोन्यात गुंतवला होता. यामुळे सोन्याने ५७ हजारांची विक्रमी उंची गाठली होती पण आता ती पुन्हा ५० हजारांच्या आत आली आहे. सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढतील असं सगळ्यांना वाटलं होतं.

मात्र कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आणि लोकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली. यामुळे सोने फिके पडले. या महिन्यात सोने २ हजार ६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि उच्चतम स्तरावरून सोने ४ हजार रुपयांनी घसरले आहे.

ऑगस्टमसध्ये सोने ५६ हजारांच्या वर गेले होते पण तेव्हाच रशियाची स्फुटणीक व्ही लस आली आणि सोन्याची घसरण सुरू झाली. गुरुवारी सोने ४८ हजार ५१७ रुपयांवर आले होते.

हा दर उच्च दरापेक्षा ८२०० रुपयांनी कमी होता. ६ नोव्हेंबरचा विचार करता सोन्यामध्ये ४००० रुपयांची घट झाली. पुढेही कोरोना लसीमुळे आणखी सोने खाली येऊ शकते कारण गुंतवणूकदार सोन्यातून आपले पैसे काढून घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

महिन्याभरात सोने चार हजार रुपयांनी घसरले; अजून सोने किती रुपये घसरणार?

प्रीती झिंटामूळे झाला होता सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.