“आज माझे आणखी एक स्वप्न पुर्ण झाले, आईवडीलांना विमानात बसवले”; नीरज चोप्राची भावूक पोस्ट

जपानच्या टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा त्याच्या कामगिरीनंतर सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली पण तो अजूनही जमिनीशी जोडलेला असून आपल्या घरच्या मैदानावर सराव करताना दिसतो.

आता ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे स्वप्न पुर्ण झाल्यानंतर आता नीरजचे दुसरे स्वप्न पुर्ण झाले आहे. आईवडिलांना एकदा तरी विमानात बसवू असे नीरजचे स्वप्न होते, ते त्याने आज सकाळी पुर्ण केले आहे. यानिमित्ताने त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विमानात बसलेल्या आईवडिलांचे फोटो शेअर केले आहे.

आज आयुष्याचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले जेव्हा मी माझ्या आईवडिलांना पहिल्यांदा विमानात बसवू शकलो, बसलेले दिसले. सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी नेहमीच कृतज्ञ राहीन, असे ट्विट करत नीरजने फोटो शेअर केले आहे.

गेल्या महिन्यात नीरजने म्हटले होते की, प्रकृती अस्वस्थ्यमुळे आणि प्रवासामुळे त्याचे प्रशिक्षण सुरू होऊ शकत नाही, त्यामुळे त्याच्या टीमने यावर्षीचा सिजन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

नीरजने ऑलिम्पिकमध्ये भालाफेकच्या अंतिम स्पर्धेत ८७.५८ मीटर थ्रो टाकून ट्रॅक अँड फील्डमध्ये देशातील पहिले पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकावर लक्ष्य ठेवले होते.

विशेष गोष्ट अशी की ऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी टोकियोमध्ये जागतिक अॅथलेटिक्सने ट्रॅक अँड फील्डच्या १० जादुई क्षणांमध्ये समाविष्ट केली.

महत्वाच्या बातम्या-

‘तुझे गाणे ऐकण्यापेक्षा मी विष पिणे पसंत करेन’, असं म्हणणाऱ्या ट्रॉलर्सची टोनी कक्करने केली बोलती बंद
बाप सरपंच असला तरी पोर बोलते हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा हा फोटो होतोय तुफान व्हायरल..
मोठी बातमी! आता Whatasapp वरून पैसे ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या कसे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.