गणपती विसर्जनावेळी चुकून साडेपाच तोळं सोन्याच्या मुकूटाचेही विसर्जन, पुढे काय झालं पहा..

मुंबई । सध्या गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशातच काल दीड दिवसांच्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. अनेक ठिकाणी दीड दिवसच गणपती बसवले जातात. असे असताना वसईत दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनावेळी एका कुटुंबाकडून एक चूक झाली.

यामुळे ते चिंतेत होते, दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करताना पाटील कुटुंबीयांचे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे मुकूट हरवले. बाप्पाच्या विसर्जनावेळी सोन्याचे मुकूट देखील पाटील कुटुंबीयांकडून चुकून विसर्जित झाले, नंतर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली.

यानंतर तब्बल १२ तासांच्या शोधानंतर मुकूट सापडले आणि पाटील कुटुंबीयांच्या जीवात जीव आला. बाप्पाने जाता जाता पाटील कुटुंबीयांसमोर निर्माण झालेले विघ्न दूर केले आहे. पाटील कुटुंबीयांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उत्साहात बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती.

बाप्पाचे दीड दिवसात विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी घाईघाईत साडेपाच तोळ्याचे सोन्याचे मुकूट देखील विसर्जित झाले होते. या मुकूटाची किंमत तीन लाख रुपये इतके होती. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली.

१२ तासांच्या प्रयत्नांनंतर बाप्पाचे मुकूट सापडले आणि बाप्पा पावल्याचे समाधान पाटील कुटुंबीयांनी व्यक्त केले. सुरुवातीला त्यांनी घरामध्ये शोध घेतला. मात्र हे मुकुट त्यांना सापडले नाही. नंतर त्यांचा लक्षात आले की गणपती सोबत हे मुकुट गेले आहे.

यानंतर अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. ज्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे, त्या ठिकाणी जाऊन शोध घेण्यात आला. अखेर हे मुकुट सापडले, आणि त्यांच्या जीवात जीव आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.