श्रीमंतांना सोडण्यासाठी दबाव, दिवाळीत सोन्याची बिस्कीटं; परमबीर सिंगाविरोधात अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

मुंबई । सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेल्या काही दिवसात वादात सापडले आहेत. आता त्यांच्यावर अकोल्याच्या पोलीस निरीक्षक पदावरील एका अधिकाऱ्यानं केले आहेत. परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

त्यांनी पैसा अनेक ठिकाणी गुंतवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणारे पत्र समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर आता मोठा आरोप करण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या पत्रात परमबीर सिंग दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक डिसीपीकडून सोन्याची ४० टोळ्यांची बिस्कीटे भेट घेत असल्याचा धक्कादायक आरोप भीमराव घाडगे यांनी केला आहे. सध्या ते अकोला नियंत्रण लक्षात आहेत.

परमबीर सिंग यांच्यावरील हे आरोप हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचाही यात समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याबाबत पत्र पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागालादेखील पत्र पाठवण्यात आले आहे. आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

या अधिकाऱ्याच्या पत्रामध्ये परमबीर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांच्या पत्नीचे इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. त्याठिकाणी त्यांनी हजारो कोटी गुंतवले आहेत, तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय करतो. त्याठिकाणी या भ्रष्टाचाराचे पैसे गुंतवण्यात आल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.

अगोदर देखील त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. त्यामुळे एकापाठोपाठ एक आरोपांमुळे आता परमबिर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्रने अमिताभ बच्चनबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाले शोलेच्या शुटींग वेळी तर

देवमाणूस टाटांचा मदतीचा सपाट सुरूच; हवाईमार्गे परदेशातून ऑक्सिजन टॅंक भारतात दाखल

‘एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, अन् दुसरीकडे सरकार, संघमालक IPL वर एवढा खर्च करतायेत’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.