सोने – चांदी पुन्हा स्वस्त, जाणून घ्या का खाली येताहेत सोन्या चांदीचे दर

मुंबई | दररोज सोन्याच्या वाढत्या किमतींनी ग्राहकांचे डोळे पांढरे केले आहे. सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असून यामुळे गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे.

आता सोन्याच्या दरात घसरण झाली असून दिल्ली बुलियन मार्केटमध्ये बुधवारी सोन्याच्या दर प्रति दहा ग्रॅम 600 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहेत. त्याचवेळी, एक किलो चांदीची किंमत ही 3000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीने खाली गेली.

तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहे. याचप्रमाणे अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या जोरदार मजबुतीमुळे परदेशी बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याची माहिती तज्ज्ञांकडून सांगण्यात आली आहे.

दरम्यान, एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार बुधवारी दिल्ली सराफा बाजारातील 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत घटून ते प्रति 10 ग्रॅम 54,909 रुपयांवरून 54,269 रुपयांवर आले.

या काळात पती 10 ग्रॅमच्या किंमती या 640 रुपयांनी खाली आल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 53424.00 रुपयांवर आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.