जेवढे सोनं जमा झाले आहे, त्यातून दवाखाना, मेडिकल कॉलेज उभारणार, ‘या’ देवस्थानचा मोठा निर्णय

सगळीकडे सध्या कोरोनाचे सावट आले आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेकांना ऑक्सिजन बेड रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच औषध उपलब्ध होत नाहीत. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

असे असले तरी अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहे. कोण आर्थिक मदत करत आहे, तर कोण रुग्णांना दवाखान्यातील सोयी उपलब्ध करून देत आहेत. अशातच आता नांदेड येथील गुरुद्वारामध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून जेवढे सोनं जमा झाले आहे ते कोरोनासाठी खर्च केले जाणार आहे.

यामधून भव्य दवाखाना आणि मेडिकल कॉलेज उभे करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. याबाबत गुरुद्वारा कमिटीतर्फे माहिती देण्यात आली आहे. यामुळे याचा अनेकांना फायदा होणार आहे. अनेक संस्थाने पुढे येऊन मदत करत आहेत. यामुळे कोणाला हरवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

याबाबत लवकरात लवकर निर्णय झाला तर लवकरच याचे काम सुरू होणार आहे. राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना उपचार मिळाले नाहीत. यावेळी वैद्यकीय सेवांचा मोठा अभाव जाणवला. केवळ बेड उपलब्ध नसल्याने अनेकांचे मृत्यू झाले.

येणाऱ्या काळातील परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून भक्त मोठ्या प्रमाणावर सोनं दान करत आहेत. यामुळे याठिकाणी सोनं मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहे. याचा काहीतरी सामाजिक उपयोग झाला पाहिजे, म्हणून गुरुद्वारा कमिटीने हा निर्णय घेतला आहे.

यामुळे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आरोग्याच्या सोयींवर भर देणे गरजेचे झाले आहे. यामुळे नांदेड गुरुद्वारा कमिटीने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

ताज्या बातम्या

पहिल्या डोसनंतर ‘या’ कोरोना लसीतून जास्त अँटीबॉडीज तयार होतात; ICMR च्या प्रमुखांचा दावा

राजकूमारने केला होता अभिनेत्री वहिदा रहमानचा अपमान; दुखी झालेल्या वहिदा रहमानच्या डोळ्यात आले पाणी

पृथ्वीवरचे तुझे काम संपलेय, तू आता परत ये; साधूने आत्महत्या करून लिहिली सुसाईड नोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.