तारक मेहताच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार दया बेनची भूमिका

मुंबई । एक काळ असा होता की ‘ये है मोहब्बतें’ हा टीव्ही शो टीआरपीचा झेंडा फडकावत होता आणि या कार्यक्रमाची मुख्य अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी-दहियाला घरोघरी लोकप्रियता मिळाली होती. दिव्यांका ही सध्या केपटाऊनमध्ये असून ‘खतरों के खिलाडी ११’ या शोची शूटिंग करत आहे.

दरम्यान, दिव्यांकाशी संबंधित एक माहिती समोर आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या एका टीव्ही मालिकेत दिव्यांका त्रिपाठी-दहियाला ‘दयाबेन’च्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. तथापि, तिने ही ऑफर नाकारली आहे. याबाबत अद्याप दिव्यांका त्रिपाठी-दहियाकडून कोणतेही निवेदन आले नसले, तरी दिव्याका लवकरच याबाबत माहिती देणार आहे.

दिव्यांका त्रिपाठी सध्या ‘खतरों के खिलाडी सीझन ११’ शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शोमध्ये दिव्यांका कशी कामगिरी करेल हे वेळोवेळी स्पष्ट होईल. पण ती या शोमध्ये येताच या शोची मागणी आणि लोकप्रियता दोघांमध्येही वाढ झाली आहे. या वृत्ताची चर्चा अशा वेळी आली आहे, जेव्हा दिशा वाकानीच्या शोमध्ये परतण्याबद्दल बर्‍याच गोष्टी सतत बोलल्या जात आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील दिशा वाकानीची व्यक्तिरेखा शोमधील एक यशस्वी आणि प्रसिद्ध पात्रांपैकी एक आहे. दिशा वाकानी शोमध्ये दयाबेनची व्यक्तिरेखा साकारत आहे, जिची बोलण्याची शैलीपासून गमतीदार अभिव्यक्तींपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना आवडली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. २८ जुलै २००८रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल १३ वर्ष ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका सगळ्यांनाच खूप आवडते, या मालिकेचे लहान पासून ते मोठ्या पर्यंत सगळेच चाहते आहेत.

ताज्या बातम्या

VIDEO: नदीत पिकनिक पडली भारी, कुटुंब अडकले पुरात, पुढे जे झाल तुम्हीच पहा

पुस्तक सोड, चखना आन, तुझा मुलगा कुठे कलेक्टर होणार आहे? पण तोच मुलगा झाला कलेक्टर, जाणून घ्या…

हृदयद्रावक! रेल्वे रुळांवर पडलं होतं तरूणाचं शव; खिशातील सुसाईड नोट वाचताच सर्व हादरले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.