तारक मेहता मधील छोट्या गोगीला जीवे मारण्याची धमकी कुणी दिली? गोगी काय म्हणतोय पहा..

टीव्हीच्या अतिशय लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मध्ये दिसणाऱ्या ‘गोगी’ म्हणजेच समय शहाविषयी काही दिवसांपुर्वी मोठी बातमी येत होती. गेल्या १५ दिवसांपासून त्याला जिवे मारण्याची धमकी मिळत असल्याची बातमी आली होती. परंतु आता ही अफवा असल्याचे समय शहाने सांगितले आहे.

समय शहाने ट्विट करून घटनेचे संपूर्ण सत्य सांगितले आहे. ‘बर्‍याच वृत्तवाहिन्यांमधून अशी अफवा पसरली आहे की मला १५ दिवसांपासून धमकावले जात आहे, परंतु हे सत्य नाही, लॉकडाऊन होण्यापूर्वी ही घटना घडली होती. जिथे एका दुचाकीस्वाराने मला शिवीगाळ केली आणि तेथून पळ काढला. दुसऱ्यांदा त्यांनी माझ्या आईला शिवीगाळ केली आणि तेथून पळ काढला.’

समय शाहने पुढे लिहिले की, ‘आणि ही तिसरी वेळ आहे जिथे त्याने मला शिवीगाळ केली पण यावेळी तो पळून गेला नाही तर बडबड करायला लागला. पहिल्यांदा त्यांनी मला धमकावले. पण तुमच्या प्रेम व समर्थनाबद्दल तुमचे सर्वांचे आभार. माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

ऋतुराज गायकवाडने केला खास विक्रम; जो विक्रम धोनी आणि सुरेश रैनाही करू शकले नाही

सुशांत प्रकरणातील ‘त्या’ मुद्द्यावर अखेर सलमान खानने सोडले मौन; म्हणाला..

यशोगाथा! एक एकरात घेतले ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन; कमवतोय वर्षाला लाखो रुपये 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.