‘अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी गाझीपुरला जातेय’

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला अनेक शेतकरी संघटनांनी, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. दोन दिवसांपुर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे गाझीपुर सीमेवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहेत.

याबाबत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, “मी आणि अनेक पक्षांचे नेते दिल्लीला जात आहोत. गेल्या ७० दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, शेतकऱ्यांशी लवकरात लवकर चर्चा करून मार्ग काढावा”.

“अन्नदाता सुखी भव:… अशी मराठीमध्ये म्हण आहे पण आज अन्नदाताच आंदोलनाला बसलाय. याच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्याची लेक म्हणून गाझीपुरला जातेय. सरकारने संवेदनशीलपणे चर्चा करून अन्नदात्याला न्याय द्यावा अशी विनंती करते”. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्त्वाच्याा बातम्या-
 तुला कापू का? कोंबडी म्हणते नको-नको, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
मनसेने काढला वचपा! शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केला मनसेत प्रवेश
“शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं विधान
हृदयस्पर्शी चरणस्पर्श..! ‘लाईफलाईन’ रुळावर आल्यानंतर वंदन करताना सामान्य मुंबईकर, पाहा फोटो

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.