रंजीत नाथ: कोरोनाच्या काळात रोज १५० भटक्या कुत्र्यांना बिर्याणी खाऊ घालणारा देवमाणूस

नागपुर | कोरोनामुळे  हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. अनेकांना उपाशीपोटी राहावे लागले आहे. काही दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत गोरगरीबांना जेवन पुरवले आहे. गरजूंना जेवन पुरवण्याचे कार्य आजूनही सुरू आहे.

मात्र नागपुरमधील एक व्यक्ती मुक्या प्राण्यांच्या मदतीला धावला आहे. भटक्या कुत्र्यांना हा व्यक्ती स्वत:च्या हाताने चिकन बिर्याणी बनवून खायला देत आहे. दररोज शहरात फिरून जवळपास १५० कुत्र्यांना बिर्याणी खायला घातली जाते.

नागपुरचे ५८ वर्षीय रंजीत नाथ गेल्या ११ वर्षांपासून भटक्या कुत्र्यांसाठी रोज ३५ ते ४० किलो बिर्याणी बनवतात. यानंतर शहरातील १० ते १२ ठिकाणी भटक्या कुत्र्यांना स्वत:च्या हाताने खायला घालतात. सोशल मिडियावर नाथ यांच्या कार्याचे कौतूक होत आहे.

एका इन्स्टाग्राम युजर्सने भटक्या कुत्र्यांना बिर्याणी खाऊ घालत असलेल्या नाथ यांचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर लोक नाथ यांना नागपुरचा डॉग मॅन म्हणून ओळखू लागले. नाथ हे सुरूवातीला कुत्र्यांना बिस्किटे खायला घालत होते. त्यानंतर आज ते  बिर्याणी खायला घालतात.

नाथ यांना भटक्या कुत्र्यांची आवड आहे. ते कुत्र्यांना स्वत:ची मुलं समजतात. नाथ हे मुलाबाळाप्रमाणे कुत्र्यांना सांभाळतात. कुत्र्यांना भटके किंवा कुत्रे म्हणणं त्यांना आवडत नाही. जीवंत असेपर्यंत हे कार्य करत राहणार असल्याचं नाथ सांगतात.

सकाळी नाथ हे बिर्याणी बनवण्यास सुरूवात करतात. ५ वाजता बिर्याणी बनवून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यात बिर्याणी भरतात. यानंतर मोटरसायकलवर शहरातील अनेक भागांत जाऊन कुत्र्यांना बिर्याणी खायला घालतात.

आजवर नाथ स्वत:च्या खिशातून खर्च करून बिर्याणी बनवत होते. मात्र नाथ यांचे कुत्र्यांवर असेलेले प्रेम पाहून अनेक व्यक्ती मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. नाथ यांच्या कार्यामुळे माणूसकी आजूनही शिल्लक असल्याचं समोर आलं आहे. नाथ यांना कार्यामध्ये कुटूंबाचाही पाठिंबा आहे

महत्वाच्या बातम्या-
‘या’ बॉलरच्या बॉलिंगला घाबरत होते मोठमोठे बॅट्समन, आज त्याला दोन वेळचे जेवणही मिळणे झाले अवघड
दिग्दर्शकाने बोल्ड सीन्स कट केल्यामूळे दिग्दर्शकावर भडकली होती अभिनेत्री; नाव वाचून धक्का बसेल
अभिनेत्री गौहर खान उतरली पॅलेस्टाईनच्या समर्थनात, इस्त्रायलला धडा शिकवण्यासाठी केले ‘हे’ आवाहन
लग्नानंतर वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांना सोनालीने झाप झाप झापले, म्हणाली..

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.