देव तरी त्याला कोण मारी! मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या तरुणाच्या पांघरुणात शिरला कोब्रा, जाग आली अन्…

जयपूर। देशातील अनेक राज्य आहेत जिथे ग्रामीण भागात पुजारी किंवा गावातील बरेचसे ग्रामस्थ हे मंदिरात झोपायला जातात. देवावर पूर्ण विश्वास ठेऊन निवांत व कोणतीही भीती मनात न बाळगता रात्र मंदिरात घालवतात.

मात्र अनेक गावांमध्ये काही मंदिर ही थोडीफार जंगलच्या ठिकाणी असतात. त्यामुळे तेथे जंगली किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते. मात्र सध्या एक समोर आली आहे. जी वाचून तुमच्यादेखील अंगावर काटा येईल. एक तरुण मंदिरात झोपला असता त्यांच्या चादरीत अचानक कोब्रा शिरला.

सुरुवातीला त्याला काहीच कळले नाही, मात्र ज्यावेळी त्याला नाग शिरल्याची जाणीव झाली तेव्हा झटका बसल्याप्रमाणे तो तिथून दूर झाला. या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर झाला आहे. ही घटना आहे राजस्थानमधील बांसवाडा गावातील.

या गावातील एक शिवभक्त तरुण दररोज शंकराच्या मंदिरात झोपत असे. या भागात बिबट्यांची आणि कोब्रा नागांची मोठी दहशत असते. पण भगवान शंकरावर असणाऱ्या गाढ विश्वासाच्या जोरावर हा तरुण मंदिराच्या परिसरातच चादर घेऊन झोपत असे. हा तरुण रोज मंदिरातच आपली रात्र काढायचा.

मात्र तो मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक एक कोब्रा त्याच्या पांघरूणात शिरला. झोपेत असणाऱ्या तरुणाला सुरुवातीला बेडूक पांघरूणात शिरल्यासारखं वाटलं. त्यामुळे पायाने त्याने बेडकाला दूर झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्राणी पांघरूणातून बाहेर न जाता तिथेच वळवळू लागला.

पांघरुणात शिरलेला प्राणी हा बेडूक नसून दुसरा कुठला तरी असल्याची त्याची खात्री पटली. व तो चटकन उठला व झोपेतून ताडकन उभा राहिला. त्याचवेळी कोब्राने हवेत उडून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण काही अंतरावर उभा असल्याने या हल्ल्यातून बचावला.

काहीवेळा नंतर कोब्रा घाबरला व तेथून निघून गेला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून अनेकांना ऐकून देखील अंगावर काटा येत आहे. मात्र या घटनेनंतर तरुण मात्र नशिबाच्या जोरावर वाचला आहे.
महत्वाच्या बातम्या
अजयच्या मुलीला करावा लागला वर्णभेदाचा सामना; अखेर कंटाळून मुंबई सोडून सिंगापूरमध्ये काढला पळ 
‘माझ्या जीवाला धोका, रुपालीताई मला घेवून चला’; वर्ध्याच्या भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी 
आज मला असह्य दुख: होतय! आईच्या निधनानंतर अक्षयकुमारने जे लिहीलंय ते वाचून ढसाढसा रडाल 
अजितदादांच्या कामांचा जगात डंका! कोरोना काळातील कामांमुळे सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्काराने गौरव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.