पोलीस नव्हे देवता! पोलीसाने भाजीविक्रेत्यासोबत जे केले ते पाहून तुम्हीही हेच म्हणाल

मुंबई। गेले वर्ष दीड वर्ष संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचा विळखा आहे. त्यामुळे नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत. या काळात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, तसेच पोलिसांनी आपली कामगिरी चोख पार पाडली आहे.

देशात कोरोना विषाणूपासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी सरकारकडून कडक लॉकडाऊन लावण्यात आले. मात्र या लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांचे तसेच हातावर पोट असणाऱ्यांचे आतोनात हाल झाले. या काळात अनेकांचे छोटेमोठे व्यवसाय बंद झाल्याने जेवणाचे हाल होऊ लागले.

मात्र या कोरोनाच्या काळात पोलिसांनादेखील मोठ्या प्रमाणात समस्येना सामोरे जावे लागले. तसेच बऱ्याचवेळा त्यांना संतप्त नागरिकांकडून मारहाणही करण्यात आली. कोरोना काळातील अनेक पोलिसांचे नागरिकांसोबतच्या गैरवर्तनाचे फोटोज व व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामुळे पोलिसांनी जरी आपली कामगिरी चोख पार पाडली असली तरी त्यांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात ढासळली.

मात्र यासगळ्या पलीकडे जाऊन कित्येक पोलीस अधिकारी जनतेच्या हितासाठी कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करतात. लोकांना मदत करतात. अगदी स्वतःच्या जीवाची काळजी न करताही लोकांना वाचवतात. व सध्या याचंच उदाहरण म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. एका अपंग भाजी विक्रेत्याला चक्क या अधिकाऱ्याने सरप्राईस दिले असेच म्हणता येईल. या व्हिडिओमध्ये एक भाजीविक्रेता भाजी विकत आहे. मात्र त्याने मास्कही घातलेला नाही. अशावेळी अचानक पोलिसांची एन्ट्री होते. पोलीस अधिकाऱ्याला बघून सर्वच घाबरतात.

मात्र हे पोलीस अधिकारी त्या भाजी विक्रेत्याच्या जवळ जाऊन त्याची चौकशी करतात. त्याला मास्कही देतात. एवढंच नाही तर त्याला पैसे देऊन त्याची सगळीच्या सगळी भाजी खरेदी करतात. आणि मग अशावेळी जनतेला पोलिसांच्या रुपात देवाचे दर्शन घडते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळीकडे याच कौतुक होत आहे.

याआधीही पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे आत्मह-त्येचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी वेळीच रोखले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घरगुती वादाच्या कारणावरुन ही महिला आत्मह-त्येचा प्रयत्न करत होती. मात्र, तेव्हा औरंगाबादच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून थेट दरवाजा तोडला आणि महिलेचे प्राण वाचवले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.