…म्हणून डाॅक्टर सांगतात आईचे दुध न मिळू शकणाऱ्या बाळाला पाजावे बकरीचे दुध

बकरीच्या दुधात चांगले प्रमाणात मॅग्नेशियम असते. आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना प्राण्यांचे दूध देखील दिले जाते. या दुधांमध्ये चांगली पौष्टिक तत्वे असतात जी बाळाला अधिक सक्षम बनवतात. या व्यतिरिक्त बकरीच्या दुधाचे अनेक फायदे आहे ते आज आपण जाणुन घेणार आहोत.

संशोधनात स्पष्ट केले आहे की, बकरीच्या दुधामुळे लोह चे प्रमाण वाढण्यास मदत होते. बकरीचे दूध प्यायल्याने आतड्यातील सूज कमी होण्यास मदत होते असे एका संशोधनाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. रोज ग्लासभर बकरीचं दूध पिणं आरोग्याला फायदेशीर आहे.

कॅल्शियमची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडं कमजोर होतात. बकरीचे दूध प्यायल्याने कॅल्शियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते. बकरीच्या दूधाच्या सेवनाने हाडं मजबूत होतात. गायीच्या दुधापेक्षा बकरीच्या दुधात सेलेनियम, नियासिन, आणि व्हिटॅमिन ए चे प्रमाण सर्वाधिक असते.

लॅक्टोज चे प्रमाण बकरीच्या दुधात कमी असते व गायीच्या दुधात अधिक ज्यामुळे एलर्जी होते म्हणून गायीचे दूध शक्यतो टाळावे. त्याचबरोबर बकरीच्या दुधात स्मरणशक्ती वाढवणारे कॉन्जुगेट लिनोलिक एसिड असते.

बकरीच्या दूधामध्ये सेलेनियम मिनिरल्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास मदत होते. शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यास आणि मजबूत ठेवण्यास हे मिनरल फायदेशीर ठरते.

हृद्याचे स्वास्थ्य सुधारण्यासही बकरीचे दूध फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. हार्ट अटॅक, स्ट्रोक्स या समस्यांचा त्रास रोखण्यासाठी बकरीचं दूध फायदेशीर ठरतं. बकरीच्या दूधात पोटॅशियम घटकही मुबलक असल्याने रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.

बकरीच्या दुधामुळे ब्लड प्रेशर कमी होते कारण यात पोटेशियम चे प्रमाण जास्त असते. तसेच बकरीच्या दुधात ३५% फॅटी एसिड असते आणि ते शरीरासाठी खूप उपयुक्त असते.

५ ते ७ खजुरांसोबत ताजे बकरीचे दूध प्यायल्यास सेक्स पॉवर वाढण्यास चालना मिळते. याकरिता रात्रभर खजूर दूधात भिजवून ठेवा. दुसर्‍या दिवशी हे दूधाचं मिश्रण गरम करून प्यावे.

प्रोटिनच्या सेवनामुळे शरीराचा विकास होण्यास मदत होते, बकरीच्या दूधात प्रोटीन घटक मुबलक असतात. मुलांची योग्यरित्या वाढ व्हावी असे वाटत असल्यास बकरीच्या दूधाचा आहारात समावेश करा.

बकरीच्या दुधात इग्लूटीनीन नावाचे तत्त्व नसते हे तत्त्व गाईच्या दुधात जास्त प्रमाणात आढळते व त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. बकरीच्या दुधात फॅट पार्टिकल्स नसतात. त्यामुळे बालकांमधील प्रथिनयुक्त कणांची संख्या वाढते व दूध न पिण्याची समस्या कमी होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.