या बँकेत पैसे नाही चक्क बकऱ्या मिळतात, महाराष्ट्रात या ठिकाणी आहे ‘बकऱ्यांची बँक’

आतापर्यंत तुम्ही अनेक बँक बघितल्या असतील. जसे की ब्लड बँक, वॉटर बँक, खातेदारांची बँक या अशा अनेक बँक आपण पहिल्या आहेत. पण आज आम्ही तुम्हाला बकऱ्यांच्या बँक बद्दल सांगणार आहोत.

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. महाराष्ट्रात एका ठिकाणी बकऱ्यांची बँक आहे. अकोल्यामध्ये ही बँक आहे आणि तिचे नाव आहे गोट बँक ऑफ कारखेडा. ही बँक अकोला जिल्ह्यातील सांघवी मोहाली गावातून चालवली जाते.

या आगळ्या वेगळ्या बँकेला अनेकांनी भेट दिली आहे. या बँकेची स्थापना २०१८ साली ५२ वर्षीय नरेश देशमुख यांनी केली होती. या बँकेत आतापर्यंत १२०० पेक्षा जास्त खातेदार आहेत. या बँकेत १२०० रुपयांचे ऍग्रिमेंट केले जाते आणि एक गर्भवती बकरी खातेदाराला दिली जाते.

तर ऍग्रिमेंट असे असते की १२०० रुपयांत तुम्हाला प्रेग्नेंट बकरी दिली जाते आणि नंतर ४० महिन्यांनी तुम्हाला बँकेला ४ बकऱ्यांची पिल्ले आणून द्यावी लागणार आहेत. नरेश देशमुख यांना ही कल्पना एका मेहनती शेतकऱ्याकडून मिळाली होती.

त्या शेतकऱ्याला बकऱ्यांकडून चांगले उत्पादन मिळाले होते. त्या कमाईतून तो घर चालवायचा आणि छोटी मोठी जमीन खरेदी करायचा. तो कसे काय करतो यावर नरेश देशमुख यांचे पूर्ण लक्ष असायचे. यानंतर मी यावर विचार केला आणि बकऱ्यांची बँक खोलली.

सुरुवातीला त्यांनी ४० लाखांच्या ३४० बकऱ्या खरेदी केल्या होत्या. त्यानंतर गरजू शेतकऱ्यांकडून ११०० रुपये घेऊन एक एक बकरी देऊन टाकली. नंतर ४० महिन्यांनी त्यांना ४ पिल्ले आणून देण्यास सांगितले.

बकरी ४० महिन्यात ३० पिल्लांना जन्म देऊ शकते. मजुरांना देण्यात आलेल्या बकऱ्यांपैकी ८०० पिल्ले त्यांना मिळाली. त्यांनी ही पिल्ले एका कॉन्ट्रॅक्टरला विकली आणि त्यांना १ कोटी रुपयांचा फायदा झाला.

बकऱ्यांची किंमत ही वजनावर ठरवली जाते. बकऱ्याचे वजन ३५ ते ५२ किलो असेल तर बकरा १२ ते १८ हजार रुपयांना विकला जातो. साधारण बकऱ्याचे किंवा बकरीचे जीवन हे ८ ते १२ वर्षे इतके असते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
..म्हणून ‘’अजित पवार पुन्हा नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’’, भाजपच्या नेत्याचा खुलासा
पॉर्न स्टार मिया खलिफा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा फोटो पोस्ट करुन म्हणतीये….
…अजय देवगनने अर्धवट हनीमून सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला होता
रात्री बाथरूममध्ये घुसून विधवा वहीनीवर दिराने केला बलात्का.र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.