Share

गोव्यात काँग्रेसचे सरकार येणार, काँग्रेसची २० जागांवर आघाडी; भाजप मात्र पिछाडीवर

Modi-Rahul

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजप(BJP) पक्ष आघाडीवर असून समाजवादी पक्ष पिछाडीवर पडला आहे. पण गोवा(Goa) राज्यात भाजप पिछाडीवर पडले असून काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे गोव्यात इतर राज्यांपेक्षा वेगळी परिस्थिती दिसत आहे.(goa state congress government come)

गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान झाले होते. ४० जागांपैकी सर्व जागांचे कल आले असून काँग्रेस २० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 16 जागांवर पुढे आहे. टीएमसी आघाडी 4 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात बहुमतासाठी २१ जागांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही आशादायक बातमी असून या निकालांमुळे भाजपला धक्का बसला आहे.

निवडणुकीच्या आधीच दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बंड केलं होतं. तसेच भाजपच्या आणखी बड्या नेत्यांनी गोव्यामध्ये बंड केलं होते. त्याचा फटका भाजपाला बसला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. यंदा गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी ३०१ उमेदवारांनी भवितव्य आजमावलं होतं.

गोव्यात भाजप, काँग्रेस ,आप आणि टीएमसी या राजकीय पक्षांनी मतदार उभे केले होते. तसेच यंदा शिवसेना देखील गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यामुळे गोव्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली होती. पण हाती आलेल्या निकालांवरून गोव्यात काँग्रेसने आघाडी मिळवली आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

एक्झिट पोलनुसार, गोव्यात कोणत्याही एक पक्षाला बहुमत मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. तसेच इतर पक्षांमध्ये काँग्रेस दुसऱ्या तर आप तिसऱ्या क्रमांकावर असेल, असा अंदाज आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच चित्र स्पष्ट होईल.

देशामध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण ४०३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
उत्तराखंडात भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर; हरीश रावत म्हणाले, देवाची कृपा आहे, काँग्रेसच येणार
उत्तर प्रदेशमध्ये सपाची जोरदार मुसंडी; सुरवातीच्या आघाडीनंतर भाजपच्या जागा कमी व्हायला सुरवात
पंजाबमध्ये आपची जोरदार घोडदौड; कॉंग्रेसची मात्र पिछेहाट

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now