Share

Goa Nightclub Fire : पत्नीला बाहेर काढलं, तीन मेहुणींना वाचवण्यासाठी पुन्हा आगीत शिरला, पतीसह तिघी जोशी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू

Goa Nightclub Fire : गोव्यातील (Goa) मंगळवारच्या रात्री घडलेली भीषण घटना, ‘Birch By Romeo Lane’ नाईटक्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. आग ही डान्स फ्लोअरजवळ फोडलेल्या फटाक्यांमुळे लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारी नियमांची अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचेही समोर आले आहे.

दिल्ली (Delhi) येथील गाझियाबाद (Ghaziabad) येथील जोशी कुटुंबाच्या सुट्टीच्या वेळी हा अपघात झाला. भावना जोशी (Bhavna Joshi) या महिलेने आपल्या पती विनोद कुमार (Vinod Kumar) यांना वाचवलं, पण त्यांचा पती आणि तिघी बहिणी – अनिता जोशी (Anita Joshi), सरोज जोशी, कमला जोशी (Kamla Joshi) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पतीने पत्नी वाचवल्यानंतर बहिणींना वाचवण्यासाठी पुन्हा आगीत शिरला, मात्र ते परत येऊ शकल नाहीत.

आगीत आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. भावना जोशी एकट्याच बचावल्या, परंतु पती आणि बहिणींच्या मृत्यूने त्या शोकाकुल झाल्या.

मुख्यमंत्री सावंत यांनी क्लबचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोडक (Rajiv Modak), महाव्यवस्थापक विवेक सिंग, बार व्यवस्थापक राजीव सिंघानिया आणि गेट व्यवस्थापक रियांशू ठाकूर (Rianshu Thakur) यांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, क्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा (Gaurav Luthra) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल.

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now