Share

GMC Pune Recruitment 2025 : पुण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 354 रिक्त जागांसाठी भरती, 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

GMC Pune Recruitment 2025 : पुणे (Pune) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) मध्ये विविध चतुर्थश्रेणी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगण्यात आले असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 आहे. एकूण 354 रिक्त जागांवर ही भरती होणार आहे.

रिक्त पदांची तपशीलवार माहिती

पदाचे नाव पदसंख्या
गॅस प्लँट ऑपरेटर 1
भांडार सेवक 1
प्रयोगशाळा परिचर 1
दवाखाना सेवक 4
संदेश वाहक 2
बटलर 4
माळी 3
प्रयोगशाळा सेवक 8
स्वयंपाकी सेवक 8
नाभिक 8
सहाय्यक स्वयंपाकी 9
हमाल 13
रुग्णवाहक 10
क्ष-किरण सेवक 15
शिपाई 2
पहारेकरी 23
चतुर्थश्रेणी सेवक 36
आया 38
कक्ष सेवक 168
एकूण 354

शैक्षणिक पात्रता

अधिकांश पदांसाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव किंवा प्रमाणपत्र अनिवार्य आहे (उदा. माळी प्रमाणपत्र, ITI Barber, 1 वर्ष अनुभव इ.)

वयोमर्यादा

  • 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे

  • मागास, खेळाडू, अनाथ, आ.दू.घ अर्जदारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत

परीक्षा फी

प्रवर्ग फी
खुला ₹1000/-
राखीव ₹900/-

पगारश्रेणी

₹15,000/- ते ₹47,600/- पर्यंत (पदानुसार बदलणार)

महत्वाची माहिती
मुद्दा तपशील
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025
परीक्षा नंतर कळवली जाईल
अधिकृत संकेतस्थळ https://bjgmcpune.com/

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now