Share

Suryakumar Yadav : ‘सूर्या जे करतो, ते मी स्वप्नातही करू शकत नाही’; जगातील सर्वात विस्फोटक फलंदाजाने दिली कबुली

Suryakumar Yadav : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्याने 111 धावांची इनिंग खेळून सर्वांना चकित केले. यामुळेच आता विरोधी संघाचा म्हणजेच न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटरही सूर्याचा चाहता झाला आहे.

पत्रकार परिषदेत ग्लेन फिलिप्स मंगळवारी म्हणाला, ‘सूर्यकुमारच्या गोलंदाजाच्या लाइन-लेंथचे अचूक आकलन करण्याच्या क्षमतेने मला सर्वात जास्त प्रभावित केले. येणार्‍या चेंडूचा अंदाज घेण्याबरोबरच, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यासाठी शेवटच्या क्षणी आपला शॉट बदलण्याची अप्रतिम क्षमताही त्याच्याकडे आहे.

न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्सने सूर्याचे कौतुक करताना म्हटले की, ‘सूर्या पूर्णपणे अविश्वसनीय आहे. तो जे काही करतो ते मी स्वप्नातही पाहू शकत नाही.” ग्लेन फिलिप्सने आपल्या वक्तव्यात सांगितले की, ”मला प्रयत्न करायला आवडेल, पण माझा खेळ त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे. मनगटाच्या बळावर षटकार मारण्याची क्षमता त्याला खास बनवते. अशी प्रतिभा तुम्ही क्वचितच पाहिली असेल.

स्वत:ची सूर्यकुमारशी तुलना करताना फिलिप्स म्हणाले, “माझ्याजवळ माझी ताकद आहे आणि त्याच्याकडे त्याची ताकत आहे आणि आम्ही दोघे वेगवेगळ्या प्रकारे खेळतो.” आम्ही दोघे ज्या पद्धतीने खेळतो, त्यामुळे विरोधी संघालाही आम्हाला बाद करण्याची संधी मिळते. हा T20 च्या जोखीम आणि खेळाचा भाग आहे.

बिग बॅश लीगमध्ये तुम्ही सूर्यकुमारला विकत घेऊ शकता का, असा प्रश्न मॅक्सवेलला विचारण्यात आला. ज्यावर ग्लेन मॅक्सवेल हसला आणि म्हणाला, “आमच्याकडे कितीही पैसा असला तरी त्याला खरेदी करणे बिग बॅश लीगमध्ये परवडणार नाही. आम्हाला सर्वांना संघाबाहेर काढावे लागेल, पैसे वाचवावे लागतील आणि मग सुर्याला विकत घ्यावे लागेल”

सूर्यकुमार यादवने 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आपले दुसरे टी-20 शतक झळकावून आपल्या फलंदाजीचा धडाका दाखवला. त्याच्या 51 चेंडूत नाबाद 111 धावांच्या खेळीने भारताला 65 धावांनी विजय मिळवून दिला होता.

सूर्यकुमार यादव सध्या आपल्या स्फोटक फलंदाजीने जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. सर्वत्र त्याला मोठी मागणी आहे.
२०२२ या वर्षात सुर्यकुमारने चांगली कामगिरी केली आहे.

महत्वाच्या बातम्या
Shridevi : लोकं म्हणतात श्रीदेवीने पैशांसाठी २ मुलांचा बाप असलेल्या बोनी कपूरसोबत केले लग्न; पण खरे कारण वेगळेच..
मुलाला शेवटचं पाहायचं होतं पण नशीबात ते सुद्धा नव्हतं, रस्त्यावर सोडलेल्या आईचा वृद्धाश्रमात मृत्यू
Ruturaj Gaikwad : मराठमोळ्या ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड! एका ओव्हरमध्ये ठोकले ७ सिक्स; तडाखेबाज द्विशतकही झळकावले

ताज्या बातम्या खेळ मनोरंजन

Join WhatsApp

Join Now