ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटर लवकरच होणार भारताचा जावई!

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा आपल्या लव्ह लाइफविषयी चर्चेत आला आहे. मार्च महिन्यात मॅक्सवेलन आणि त्याची भारतीय मैत्रीण विनी रमन यांचा साखरपुडा झाला. आता लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. साखपुड्यानंतर या दोघांची एंगेजमेंट छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली.

आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळलेला मॅक्सवेल

आणि विनी बराच काळ एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. विनी आणि मॅक्सवेलची भेट २०१७ मध्ये झाली आणि तेव्हापासून ते डेटिंग करत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ग्लेनने काही काळ ब्रेक घेतला होता. आपल्याला मानसिक स्वास्थ्याच्या काही समस्या असल्यामुळे हा ब्रेक घेणे नितांत गरजेचे असल्याचे त्याने म्हटले आहे. या ब्रेकनंतर ग्लेनने पुन्हा दमदार कमबॅक केले व सध्या त्याचा फॉर्म अतिशय जोरात आहे.

या काळात मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्यांशी सामना करताना विनीने आपल्याला खूप साथ दिल्याचे ग्लेनने सांगितले. विनी रमण एक फार्मासिस्ट आहे. विनी इन्स्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि तीही खूप फॅशनेबल आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ३८ हजार फॉलोअर्स आहेत. तसेच विनी ऑस्ट्रेलिया मध्ये काम करते.

विनी ही मूळची भारतीय वंशाची असली तरीही तिचा जन्म हा मेलबर्न मध्ये झाला आहे. ग्लेन आणि विनी यांचा साखरपुडा भारतीय पद्धतीने झाला. यावेळी त्याचे विनी आणि ग्लेन तसेच कुटुंबीय सुद्धा भारतीय पेहरावात दिसले होते.

महत्त्वाच्या बातम्या

यंदाच्या दिवाळीत राहा फटाक्यांपासून लांब; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

काही तरी नवीन येतंय! नागराज मंजुळे यांचा ‘तार’चा टिझर रिलीज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.