..त्यामुळे पिंपरीतील कुत्र्यांना वाघासारखा रंग द्या, महापौरांकडे अजब मागणी

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव धनवे-पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे यांच्याकडे अजब मागणी केली आहे. या मागणीची चर्चा सध्या सर्वत्र पसरली आहे. त्यांनी अशी मागणी केली आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील कुत्र्यांना वाघासारखा रंग द्या.

त्यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात सुशोबभीकरणाच्या नावाखाली झाडांना रंगरांगोटी करण्यात येत आहे. पण त्यामुळे प्रत्येक झाडाच्या सभोवती असणाऱ्या किमान ५० जीवांचे अस्तित्व असते. झाडाला दिलेल्या रंगामुळे या जीवांना धोका निर्माण होऊ शकतो.

सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांचा सन्मान हिरावून घेऊन नका, झाडांना विनाकारण रंग देण्याचे काम थांबवा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी असेही लिहीले आहे की झाडांना रंगरांगोटी करणे जर महापालिका प्रशासनाला चुकीचे वाटत नसेल तर शहरातील सर्व कुत्र्यांनासुद्धा वाघासारखा रंग देण्यात यावा. अशी उपरोधक मागणीही त्यांनी केली.

माधव धनवे-पाटील यांचे म्हणणे आहे की, पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि झाडांना सन्मान मिळाला हाच माझा हेतू आहे त्यामुळे मी ही मागणी केली आहे. महापौरांनी त्यांना सांगितले की, या मागणीवर तत्काळ कारवाई करण्यात येईल व झाडांना करण्यात येणारी रंगरगोटी थांबवण्यात येईल, असे आश्वासनही महापौरांनी दिले आहे.

ही माहिती माधव धनवे-पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, माधव धनवे-पाटील हे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. अंघोळीची गोळी या पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत आणि त्यांना अनेक लोकांना पाठिंबा दिला आहे.

त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील विविध भागात पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी उपक्रम राबवले आहेत. त्यांनी झाडाला ठोकण्यात येणाऱ्या खिळ्यांना काढण्याचे का मोठ्या प्रमाणात केले आहे. पण कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्याच्या त्यांच्या मागणीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या
कृषी कायदे रद्द झाल्यामुळे मुस्लिम संघटनांना मिळाले प्रोत्साहन, CAA आणि NRC रद्द करण्याबाबत आंदोलने सुरु
‘अजिंक्य रहाणेचे नशीब चांगले आहे की तो अजूनही टीममध्ये आहे’, गौतम गंभीरच्या वक्तव्यामुळे गदारोळ
अखेर ठरलंच! सलीम खान यांच्या घरची सुन बनणार बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, सलमान खान सोबत केलय सिनेमात काम
मनसेच्या धडाडीच्या नेत्या रुपाली पाटील पक्ष सोडणार? मोठे वक्तव्य केल्याने चर्चा सुरू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.