करीनाच्या जागी ‘सीता मातेची’ भूमिका या अभिनेत्रीला द्या, ट्विट करत नेटकऱ्यांची मागणी

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यावरून करिनाने ही भूमिका साकारू नये यासाठी सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

मात्र आता करीनाच्या जागी नुकतीच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री यामी गौतमला घ्यावं, असं अनेकांनी सुचवलं आहे. याविषय़ी अनेक ट्वीट्सही करण्यात आले. त्यामुळे आता यामी गौतमला ही भूमिका साकारू देणार की नाही याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

संपुर्ण सोशल मीडियावर सध्या या विषयावरून संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या ‘बेबो’वर म्हणजेच करीना कपूर खान हिच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे.

सध्या ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे. नेटकरी संतप्त होण्यामागचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, करीना कपूर एका चित्रपटात ‘माता सीता’ची भूमिका साकारणार आहे आणि यासाठी तिने तब्बल 12 कोटींची मागणी केली आहे.

मात्र ज्यावेळी ही माहित नेटकऱ्यांपर्यत पोहचली तेव्हा सर्वानी संताप व्यक्त केला. त्यानंतर करीनाने आता सीतेची भूमिका साकारू नये, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. ट्विटरवर #BoycottKareenaKhan हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

मात्र या संपूर्ण प्रकरणा विषयी अद्याप करीना किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.