..तर माझा मृतदेह वाघांना खायला द्या, अभिनेत्याचे प्राण्यांवरील प्रेम पाहून सगळेच झाले थक्क

कॉमेडियन आणि अभिनेता रिकी गर्वेस यांचे प्राण्यांवर खूप प्रेम आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून ते प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवत आहेत. जंगलातील प्राण्यांची जी शिकार होते त्याच्याविरोधात त्यांनी बऱ्याच वेळा आवाज उठवला आहे.

त्यांनी एका मुलाखतीत प्राण्यांवरचे प्रेम बोलून दाखवले आणि यावरून त्यांचे प्राण्यांवर किती प्रेम आहे हे दिसून आले. ते मुलाखतीत म्हणाले की त्यांना काहीच अडचण नाही जर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह लंडनमधील एका प्राणी संग्रहालयात एखाद्या वाघाला खायला द्या.

याच्यातून माझा काहीतरी पर्यावरणाला फायदा होईल. आणि हे बघणे पण खूप आश्चर्यकारक असेल जेव्हा लोक बघतील की एका अभिनेत्याचा मृतदेह एक वाघ खात आहे. पुढे ते म्हणाले की त्यांचे चेहऱ्यावरील हावभाव बघण्यासारखे असतील.

ते म्हणाले की कॉमेडियन नेहमी मृत्यूबद्दल बोलतात कारण यामुळे लोक अनकम्फर्टेबल होतात. मलाही अशाच डार्क विषयावर बोलणे पसंत आहे. असं वाटतं की तुम्ही लोकांना एका भयानक जंगलात घेऊन जात आहात.

मी मृत्यूबद्दल बोलताना खूप निवांत असतो कारण शेवटी सगळ्यांनाच जायचे आहे. ते शिकारीच्या खूप विरोधात आहेत. त्यांचे म्हणणे आहे की प्राण्यांना आपल्या मनोरंजनासाठी मारणे खूप मोठा अपराध आहे.

आफ्रिकन वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार जर ट्रॉफी हंटिंग सारखे कन्सेप्ट बंद झाले नाहीत तर २०५० पर्यंत बऱ्याच ठिकाणी वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यांनी वाईल्डलाईफ वेट मार्केटच्या विरोधातदेखील आवाज उठवला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.