बिहारमधील समस्तीपूरमधून(Samstipur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या आई, वडील आणि काकांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या कुटूंबातील सदस्य पैशासाठी माझ्यावर बलात्कार करू देतात, असा आरोप पीडित अल्पवयीन मुलीने केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून हे आरोप केले आहेत.(girl’s serious allegations on mother and father)
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पीडित अल्पवयीन मुलीने पोलीस अधिकारी आणि सरपंचावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. माझ्यावर दररोज २० ते २५ लोक बलात्कार करतात, असे पीडित अल्पवयीन मुलीने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर तात्काळ कारवाई केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, ” माझ्यावर दररोज २० ते २५ लोक बलात्कार करतात. माझी आई घरात दारू विकते. पोलीसही दारू पिण्यासाठी घरी येतात आणि माझ्यावर अत्याचार करतात. मी खूप असहाय्य जीवन जगत आहे. मला कोणीही मदत करत नाही. कोणीतरी मला मदत करा, नाहीतर हे लोक मला मारून टाकतील.”
पीडित अल्पवयीन मुलीने व्हिडिओमध्ये घराचा पटत देखील सांगितला आहे. पोलीस ठाण्याचे एसआय मनोज सिंहच आपल्यावर अत्याचार करत असल्यामुळे पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे पीडित अल्पवयीन मुलीने व्हिडिओमध्ये सांगितले. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दुकान आहे.
तसेच पीडित अल्पवयीन मुलीची आई घर सांभाळते. पोलिसांकडे कुटूंबियांच्या गैरकृत्याच्या संदर्भात तक्रार केली होती. त्यावर पोलिसांनी घरावर छापा देखील टाकला होता. पण कुटूंबियांनी पोलिसांना पैसे देऊन सर्व काही मॅनेज केल्याचे पीडित अल्पवयीन मुलीने व्हिडिओमध्ये सांगितले. पीडित अल्पवयीन मुलीने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आई आणि वडिलांना अटक केली आहे.
तसेच एका तरुणाला देखील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी सहियार अख्तर यांनी सांगितले की, एका मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटूंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. पैशाच्या हव्यासापोटी तिच्यावर बलात्कार होत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ज्यावेळी पीडित मुलीने या गोष्टीचा विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :-
बुमराहने युवराज सिंग स्टाईलने एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 35 धावा, केला ऐतिहासिक विक्रम
पैलवानांच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघटनेची मोठी कारवाई, शरद पवारांना धक्का
मुख्यमंत्री शिंदे अॅक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादीच्या 600 कोटींच्या कामांना लावला ब्रेक, वाचा काय घेतला निर्णय?