मुलीचे लग्न म्हटले की मोठा खर्च आला. आणि अचानक पैसे गोळा करणे म्हणजे खूपच जिकरीचे काम असते. आता मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण LIC आपल्यासाठी एक खास योजना घेऊन आली आहे.
LIC कन्यादान पॉलिसी असे या योजनेचे नाव असून या योजनेमध्ये दररोज 121 रुपयांची बचत अर्थात मासिक 3600 रुपयांचा प्रीमियम भरून तुम्ही ही योजना खरेदी करू शकता. यापेक्षी कमी किंवा यापेक्षा जास्त किंमतीचा प्रीमियमही तुम्ही खरेदी करू शकता.
जर १२१ रुपयांच्या हिशोबाने तुम्ही जर या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर २५ वर्षानंतर तुम्हाला २७ लाख रुपये मिळतील. ही पॉलीसी खरेदी करणाऱ्याचे वय कमीतकमी 30 वर्षे तर मुलीचे वय 1 वर्षं असणे आवश्यक आहे. ही योजना 25 वर्षाची असली तरी, प्रीमियम 22 वर्षांसाठी द्यावा लागेल. मात्र तुमच्या मुलीच्या वयाच्या मानाने वेगवेगळ्या पद्धतीने ही पॉलिसी खरेदी करता येते.
यामध्ये वीमाधारकाचा मध्येच मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना पैसे भरावे लागणार नाहीत. मुलीला पॉलिसीच्या शिल्लक वर्षापर्यंत प्रति वर्षाला मिळतील १ लाख. तसेच पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर नॉमिनीला मिळतील २७ लाख रुपये.
तसेच २५ वर्षांसाठी खरेदी केली जाऊ शकते पॉलिसी. २२ वर्षांपर्यंत द्यावा लागेल प्रीमियम. तसेच दररोज 121 रुपये बचत करून महिना ३६०० रुपयांचा प्रीमियम भरता येईल. अशी माहिती याबद्दल आहे.