Homeताज्या बातम्यामुलांनी २० वर्षांपूर्वी आईला घरातून हकललं, अंत्यसंस्कारालाही पाहूण्यासारखे आले; शेवटी मुलींनीच दिला...

मुलांनी २० वर्षांपूर्वी आईला घरातून हकललं, अंत्यसंस्कारालाही पाहूण्यासारखे आले; शेवटी मुलींनीच दिला खांदा

आईवडिल मुलांना सांभाळताना कोणत्याच गोष्टीची कमी पडून देत नाही. पण असे असले तरी काही वेळा मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांना घराबाहेर हाकलून देतात. अशा वेळेस मुलीच आईवडिलांना सांभाळताना दिसतात. असेच एक प्रकरण औरंगाबादच्या सिल्लोडमधून समोर आले आहे.

पोटच्या मुलांनीच आपल्या आईला ३० वर्षांपूर्वी घरातून हाकलून दिले होते. तेव्हा त्या आईला मुलींनी आणि जावयांनी आधार दिला होता. पण अखेर वृद्धापकाळाने शनिवारी आईने जगाचा निरोप घेतला आहे. त्यावेळीही आईला शेवटी मुलींनीच खांदा दिला आहे.

आपल्याच आईच्या अंत्यसंस्काराला दोन मुलांनी पाहूण्यासारखी हजेरी लावली होती. संतापलेल्या मुलींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला मुलांना हात लावून दिला नाही. तिन्ही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने आपल्या आईला खांदा देत तिरडी स्मशानभूमीत नेली आणि तिथे अंत्यसंस्कार केले.

संबंधित घटनाही औरंगाबादच्या हर्सुल परीसरातील आहे. चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांच्या वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांना सुभ्रद्रा, सुनीता, जिजाबाई या तीन मुलींनी तर जाऊबाई छाया यांनी खांदा दिला आहे. मुलांनी आईला जरी वाऱ्यावर सोडले असले तरी मुलींनी आपले कर्तव्य पार पाडले आहे.

मुलांनी जरी आईला सोडले असले तरी आईला शेवटच्या क्षणी मुलांना भेटायची इच्छा होती. तिने मुलांना अनेक वेळा फोन केला पण तरीही मुलं आले नाहीत. शेवटी मुलांच्या भेटीविनाच आईने आपले प्राण सोडले. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळीही मुलीच पुढे आल्या आणि त्यांनी आईला मुखाग्नी दिली.

३० वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून माझ्या भावांनी आईला सोडून दिले आहे. सुरुवातीची दहा वर्षे ती आम्हा बहिणींकडे राहत होती. तर गेल्या २० वर्षांपासून ती माझ्याकडे होती. मुलगी नात्याने मी माझे कर्तव्य पुर्ण केली पण माझे भाऊ हे विसरले, असे मुलगी सुभद्रा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! छोट्या भावाला जास्त एकर जमीन दिल्याने संतापला, वडिलांची गळा चिरून केली हत्या
आयटम म्हणत मुलीची छेड काढणे पोलिस पुत्राला पडले महागात, मुलीने ‘असा’ शिकवला धडा
समीर वानखेडेंची झाली बदली, आता ‘या’ ठिकाणी सांभाळणार महत्वाची जबाबदारी