Banglore : बंगळुरू येथील एका युवतीने एका युवकाची हत्या केल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. सोशल मीडियावर अश्लील फोटो पोस्ट केल्यामुळे तिने या युवकाची हत्या केल्याचे समजते. विकास असे पीडित युवकाचे नाव आहे.
विकास हा व्यवसायाने डॉक्टर होता. विकास आणि आरोपी असलेली युवती हे दोघेही लिव्ह इन मध्ये राहत होते. ते दोघे लग्नही करणार होते. मात्र, सोशल मीडियावर अश्लील फोटो पोस्ट केल्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला व या वादाचे रूपांतर हत्येत झाले.
कुणीतरी या युवतीचे खाजगी फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केले असल्याचे तिला कळले. त्यानंतर त्या युवतीने या प्रकरणाचा शोध घेतला असता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विकासनेच फेक अकाउंट तयार करून ते फोटो अपलोड केले असल्याचे तिला कळले. त्यामुळे ती युवती प्रचंड संतापली व तिने विकासच्या हत्येचा कट रचला.
युवतीने तिच्या तीन मित्रांना घरी बोलावले. त्यांनतर या चौघांनी मिळून मॉब आणि बॉटलने विकासला मारण्यास सुरुवात केली. जखमी झालेल्या विकासला सेंट जॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
२७ वर्षीय विकास हा चेन्नई येथील रहिवासी होता. विकास आणि ती युवती एका भाड्याच्या घरात राहत होते. एके दिवशी विकासाचे लॅपटॉप चेक करत असताना त्या युवतीला तिचे खाजगी फोटो शेअर केलेले त्याचे फेक अकाउंट दिसले. त्यामुळे तिचा राग अनावर झाला.
याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यावेळी युवतीसह तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे. तसेच यातील एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
Raju Srivastava : कार्डियाक अरेस्टमुळे गेला राजू श्रीवास्तव यांचा जीव, तुम्हीही ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
शशी थरूर लढवणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, सोनिया गांधींनी दिले संकेत, म्हणाल्या, हा त्यांचा…
250 हून अधिक चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीकडे उपचारासाठी नाहीत पैसै, लोकांना मागितली मदत
जम्मू-काश्मिरमध्ये इम्रान हाश्मीवर दगडफेक, बाजारात फिरताना घडलं असं काही.., वाचा सविस्तर






